• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026, MI vs RCB : रोहित शर्माची मुंबईसाठी मोठी खेळी, पण सामना मधेच सोडावा लागला; कारण..

April 12, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 स्पर्धेतील 20व्या सामन्यात मुंबई इंडियन्सा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 240 धावा केल्या आणि विजयासाठी 241 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि रयान रिकल्टन ही जोडी मैदानात आली. मुंबईला 12 च्या नेट रनरेटने धावा करायच्या होत्या. त्यामुळे प्रत्येक सामन्यात किमान 10 च्या आसपास धावांचं टार्गेट होतं. त्या दृष्टीने या जोडीने खेळी सुरू केली होती. या जोडीने 57 धावांची भागीदारी केली. पण रोहित शर्मा 19 धावांवर असताना त्याला सामना सोडावा लागला. हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे त्याने रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने 13 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार मारत 19 धावा केल्या. पण दुखापत जाणवल्याने त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. पण तिथपर्यंत त्याने मुंबई इंडियन्ससाठी मोठा टप्पा गाठला होता. रोहित शर्माच्या जागी फलंदाजीला सूर्यकुमार यादव आला.

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्ससाठी खेळताना रोहित शर्माने 6000 धावांचा पल्ला गाठला. मुंबई इंडियन्ससाठी अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरला. रोहित शर्माला 6 हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी फक्त 6 धावांची गरज होती. त्याने आरसीबीविरुद्ध सहावी धाव काढली आणि हा टप्पा गाठला. रोहित शर्मा 2 धावांवर फलंदाजी करत होता. त्यानंतर त्याने पुल शॉट मारत षटकार मारला आणि 6 हजारांचा पल्ला ओलांडला. रोहित शर्माने 231 आयपीएल सामन्यात 6 हजार धावा केल्या आहेत. रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर गेला. पण गरज पडल्यास शेवटी फलंदाजीला येऊ शकतो.

Rohit looks to be in discomfort and retires hurt. SKY replaces him in the middle.#MIvRCB

— Mumbai Indians (@mipaltan) April 12, 2026

रोहित शर्मा आयपीएल 2011 पासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. रोहित शर्माला मेगा लिलावात खरेदी केलं आणि तेव्हापासून मुंबई इंडियन्स संघातून खेळत आहे. रोहित शर्मानंतर या यादीत सूर्यकुमार यादव आहे. त्याने 3770हून अधिक धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर 3412 धावांसह किरॉन पोलार्ड, 2416 धावांसह अंबाती रायडू चौथ्या क्रमांकावर, तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 2334 धावांसह पाचव्या स्थानावर आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in