• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026, MI vs RCB : मुंबईचा आरसीबी विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय, मॅचविनर बॉलरचा पत्ता कट, Playing 11 मध्ये कोण?

April 12, 2026 by admin Leave a Comment


मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात 2012 नंतर मोहिमेतील पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिली. मुंबईने वानखेडे स्टेडियममध्ये कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करुन विजयी सुरुवात केली. मात्र त्यानंतर मुंबई विजयी ट्रॅकवरुन घसरली. मुंबईला सलग 2 पराभवांचा सामना करावा लागला. मुंबईला दिल्ली कॅपिट्ल्स आणि राजस्थान रॉयल्सने पराभूत केलं. आता मुंबई 19 व्या पर्वातील आपल्या चौथ्या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध भिडणार आहे. आरसीबीचाही हा चौथा सामना आहे.

मुंबई विरुद्ध आरसीबी यांच्यातील सामना पलटणचा होम ग्राउंड अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याने आरसीबी विरुद्ध चेजिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. अशात आता आरसीबी 20 ओव्हरमध्ये किती धावा करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल

मुंबई आणि बंगळुरु दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केला आहे. जेकब डफी याचं संघात कमबॅक झालं आहे. त्यामुळे जोश हेझलवूड या मॅचविनर आणि अनुभवी गोलंदाजाला बाहेर व्हावं लागलं आहे.

आरसीबी प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, रजत पाटीदार (कॅप्टन), टीम डेव्हिड, जितेश शर्मा (विकेटकीपर), रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी आणि सुयश शर्मा.

मुंबई इंडियन्सचे अंतिम 11 शिलेदार : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडे आणि जसप्रीत बुमराह.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026, RR vs SRH : हैदराबाद आणि राजस्थान आमनेसामने, कोणाचं पारडं जड?
  • Asha Bhosle Death News: मी अखेरचा मुगल आहे….जेव्हा फिल्म इंडस्ट्रीच्या सीक्रेट्सवर बोलल्या होत्या आशाताई
  • Horoscope : 13 एप्रिलचा दिवस खूपच खास, 3 राशींसाठी पैशांचा दुर्मिळ योग; वाचा नशीब कसं फळफळणार?
  • IPL 2026: शुबमन गिलकडून नव्या विक्रमाची नोंद, 4000 धावा करत विराटच्या पुढे निघून गेला
  • लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी सेक्सची मागणी करणारा गोकुळ चव्हाण कोण? या आधीही एका महिलेला… धक्कादायक माहिती समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in