• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026, KKR vs LSG: फिन एलनच्या विकेटवरून वाद! षटकार मारला पण आऊट दिलं Video

April 9, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 स्पर्धेतील 15व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने आले. नाणेफेकीचा कौल लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. गेल्या काही सामन्यात विजयी मार्ग शोधणाऱ्या केकेआर संघाने आक्रमक सुरूवात केली. सलामी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फिन एलन ही जोडी मैदानात उतरली होती. फिन एलन स्ट्राईकला होता आणि प्रिन्स यादव गोलंदाजी करत होता. या षटकातील पहिलाच चेंडू प्रिन्स यादवने वाइड टाकला. त्यानंतर फिन एलनने दोन चौकार मारत लखनौ सुपर जायंट्सवर दबाव वाढवला. तिसरा चेंडू निर्धाव गेला आणि चौथ्या चेंडूवर उत्तुंग फटका मारला. हा चेंडू षटकार जाईल असं वाटलं होतं. पण सीमेवर उभ्या असलेल्या दिग्वेश राठीने त्याचा अप्रतिम झेल पकडला. त्यामुळे फिन एलनचा खेळ अवघ्या 8 धावांवर आटोक्यात आला. पण आऊट देताना पंचांकडून मोठी चूक झाली. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला.

नेमकं काय झालं?

आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात प्रिन्स यादवच्या गोलंदाजीच्या चौथ्या चेंडूवर फिन एलेनने पुल शॉट मारला. हा चेंडू खूपच वर चढला आणि डीप थर्ड मॅनला असलेल्या दिग्वेश राठीने सीमेजवळ कट टू कट उभं राहून झेल पकडला. हा अप्रतिम झेल म्हणून सुरूवातीला कौतुक झालं. पण जेव्हा रिप्ले पाहिलं गेलं तेव्हा दिग्वेश राठीचा शरीराचा भाग झेल पकडताना सीमारेषेला लागला होता, असं दिसून आलं. इतकंच काय तर बाउंड्री लाईनवर असलेलं कुशनमध्येही हलकी हालचाल दिसली. पण असं असूनही पंचांनी तपासलं नाही आणि एलनला बाद दिलं. त्यामुळे हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एकीकडे केकेआरचा संघ धावांची लय शोधत असताना अशा पद्धतीने विकेट पडल्याने संताप झाला आहे. जर पंचांनी व्यवस्थितरित्या तपासलं असतं तर फिन एलनची विकेट नाही तर 6 धावा मिळाल्या असत्या.

Finn Allen got robbed by umpires 😞 pic.twitter.com/LfwepkH4o4

— ‘ (@viratkohli_un) April 9, 2026

Poor Umpiring From The Third Umpire…!!

– This Was Looking Clearly Six Leg of Digvesh Rathi Touching the Advertising Board. #IPL2026 #KKRvsLSG pic.twitter.com/n57Km6DSZJ

— 𝐓𝐡𝐞 𝐑𝐮𝐧𝐌𝐚𝐜𝐡𝐢𝐧𝐞 🜲 (@Iamlakshya_18) April 9, 2026

सोशल मीडियावर जुंपली

आयपीएल स्पर्धेत केकेआरची सुरूवात काही चांगली झाली नाही. पहिल्या दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तर एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने 1 गुण मिळाला. अशा स्थितीत पहिल्या विजयसाठी आणखी वाट पाहावी लागणार अशी स्थिती आहे. त्यामुळे ही विकेट पडल्यानंतर सोशल मीडियावर #FinnAllenNotOut आणि #BadUmpiring हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यात अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांनी डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी 52 चेंडूत 84 धावा केल्या. 10.2 षटकात 99 धावा असताना अजिंक्य रहाणे बाद झाला. त्यानंतर केकेआरची धावगती संथ झाली.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • फक्त 20 रुपयांमध्ये घरीच बनवा DIY शॅम्पू, झाडूसारखे केस होतील सिल्की….
  • डुकाटीची आतापर्यंतची सर्वात हलकी व वेगवान सुपरबाइक लाँच, किंमत ऐकून थक्क व्हाल
  • करिअरमध्ये प्रगती हवी? मुलांक 4 असलेल्या व्यक्तींनी काय करावे?
  • मोठी बातमी! युद्धविरामानंतर ट्रम्प नव्या मोहिमेवर, आणखी एक युद्ध सुरू होणार? केली खळबळजनक घोषणा
  • पूजा करताना शंख का वाजवला जातो? काय आहे शास्त्रीय महत्त्व

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in