• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 KKR : हर्षित राणाच्या जागी कुणाला संधी? अखेर घोषणा झालीच, या गोलंदाजाचा समावेश

March 26, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेतील बहुप्रतिक्षित 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्यानंतर 2 महिने या हंगामाचा थरार रंगणार आहे. मात्र त्याआधी अनेक खेळाडूंना दुखापतीमुळे या 19 व्या मोसमाला मुकाव लागलं आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी संधी देण्यात येणाऱ्या क्रिकेटपटूंचं नावं जाहीर करण्यात येत आहेत. अशात आता कोलकाता नाईट रायडर्सकडून हर्षित राणा याच्या जागी कुणाला संधी देण्यात येणार? याबाबत घोषणा करण्यात आली आहे. आयपीएलकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

हर्षित राणाच्या जागी कुणाचा समावेश?

हर्षित राणा याच्या जागी केकेआर टीममध्ये 19 व्या मोसमासाठी 33 वर्षीय गोलंदाज नवदीप सैनी याचा समावेश करण्यात आला आहे. हर्षित राणा याचा गेल्या अनेक दिवसांपासून दुखापतीसह संघर्ष सुरु आहे. मात्र हर्षित आयपीएलच्या 19 मोसमाच्या काही दिवसआधी फिट होईल, असा विश्वास टीम मॅनेजमेंटला होता. मात्र तसं काही झालं नाही. त्यामुळे अखेर 25 मार्च रोजी हर्षित राणा याच्या जागी सैनीचा केकेआर टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

हर्षितला गुडघ्याला दुखापत झाली आहे. हर्षितला या गुडघ्याच्या दुखापतीमुळे टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला मुकावं लागलं होतं. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियात हर्षितच्या जागी नवदीप सैनी याचा समावेश करण्यात आला होता.

केकेआर टीम मॅनेजमेंट गेल्या अनेक दिवसांपासून हर्षित राणा याच्या जागी कुणाला संधी द्यायची? या शोधात होती. मात्र 19 व्या मोसमाला काही दिवस बाकी असतानाही नाव जाहीर करण्यात आलं नव्हतं. अखेर हर्षितच्या जागी नवदीप सैनी याला संधी देण्यात आली आहे.

नवदीप सैनी अनुभवी गोलंदाज

नवदीप सैनी अनुभवी गोलंदाज आहे. नवदीपने टीम इंडियाचंही प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच नवदीप गेल्या अनेक मोसमांपासून आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. नवदीप आयपीएलमध्ये 32 सामने खेळला आहे. नवदीपने या 32 सामन्यांमध्ये 23 विकेट्स मिळवल्या आहेत. तसेच नवदीपने टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23 विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएल 2026 साठी केकेआरचा सुधारित संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंह (उपकर्णधार), अंगकृष रघुवंशी, मनीष पांडे, फिन एलेन, तेजस्वी सिंह, राहुल त्रिपाठी, टिम साइफर्ट, रोवमॅन पॉवेल, अनुकूल रॉय, कॅमरुन ग्रीन, सार्थक रंजन, दक्ष कामरा, रचिन रवींद्र, रमनदीप सिंह, सुनील नारायण, ब्लेसिंग मुजरबानी, वैभव अरोरा, मथीशा पथिराना, कार्तिक त्यागी, प्रशांत सोळंकी, सौरभ दुबे, नवदीप सैनी, उमरान मलिक आणि वरुण चक्रवर्ती.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटतं? कामात लक्ष लागत नाही? मग करा हा सोपा उपाय
  • Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? कर्ज वाढलंय? मग वास्तुशास्त्रामधील हा उपाय कराच
  • Chanakya Niti : तुम्हाला जर या सवयी असतील तर आयुष्यात कधी पैशांची कमी भासणार नाही, चाणक्य काय सांगतात?
  • काळी मिरीच्या ‘या’ उपायांनी तुमचं नशिब चमकणार…. एका क्लिकवर जाणून घ्या
  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in