• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026, DC vs LSG: दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्सचा हेड टू हेड रेकॉर्ड, पिच कसं असेल?

March 31, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेतील पाचवा आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. या दोन्ही संघाची मागच्या पर्वात सुमार कामगिरी राहिली. दिल्ली कॅपिटल्सने विजयी सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर गाडी रूळावरून घसरली आणि प्लेऑफमध्ये जागा मिळवता आली नाही. दुसरीकडे, लखनौ सुपर जांयट्सही काही खास करू शकली नाही. असं असताना दोन्ही संघांना या स्पर्धेत विजयी सुरूवात हवी आहे. हा सामना लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये होत आहे. लखनौ सुपर जायंट्सची धुरा ऋषभ पंतच्या हाती, तर दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व अक्षर पटेल करणार आहे. तर दोन्ही संघ या सामन्यासाठी कोणत्या प्लेइंग 11 सह उतरणार याचीही उत्सुकता आहे. अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळेल की नाही? हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

दिल्ली आणि लखनौ हेड टू हेड

आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सात सामने झाले आहेत. यात दिल्ली कॅपिटल्स थोडं पुढे आहे. दिल्ली कॅपिटल्सने 4, तर लखनौ सुपर जायंट्सने 3 सामन्यात विजय मिळवला आहे. मागच्या पर्वात दोन सामने पार पडले आणि दोन्ही सामन्यात दिल्लीने बाजी मारली. 2024 या पर्वातही दिल्ली कॅपिटल्सने दोन्ही सामने जिंकले होते. म्हणजेच लखनौ सुपर जायंट्सला शेवटचा विजय आयपीएल 2023 स्पर्धेत मिळाला होता.

कशी असेल खेळपट्टी?

इकाना स्टेडियममधील खेळपट्टी ही काळ्या मातीची आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर फिरकीला मदत होते. या खेळपट्टीवर 200 पार धावा करणं सोपं नाही. मागच्या काही सामन्यात याची अनुभूती आली आहे. या खेळपट्टीवर पहिल्या डावात 170 ते 180 धावा होऊ शकतात. पण धावांचा पाठलाग करणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार काय निवडतात याकडे लक्ष असणार आहे.

सामन्याच्या दिवशी हवामानाचा अंदाज काय?

1 एप्रिल 2026 रोजी हा सामना होत आहे. अॅक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, या दिवशी आकाश निरभ्र राहिल. तर कमाल तापमान 36 डिग्री, तर किमान तापमाना हे 23 डिग्री राहील. त्यामुळे पावसाची शक्यताच नाही. त्यामुळे हा सामना 20 षटकांचा होणार, यात काही शंका नाही.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सोन्याच्या कणांना वाहून नेणारी नदी, जिने लोकांना केले मालामाल…
  • Devendra Fadnavis | राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
  • बदनामीच्या भीतीने गायकाने स्वतःच्या गाण्याला दिलं नाही नाव, पण रिलीज होताच ठरलं सुपरहिट, आजही गाणं प्रचंड हिट
  • काही क्षणातच साफ होईल फ्रिजवरचे चिवट डाग आणि निघून जाईल कुबट वास फक्त ‘या’ एका गोष्टीने करा स्वच्छ
  • इतकं धाडस की भरदिवसा तरुणाने प्रेयसीचा गळा चिरला, क्षणात तरुणीचा मृत्यू; महाराष्ट्र हादरला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in