• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026, CSK vs PBKS: विरार फास्ट सुस्साट, पंजाब किंग्स विरुद्ध आयुष म्हात्रेचं चाबूक अर्धशतक

April 3, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची सुरूवात निराशाजनक झाली. पहिल्याच सामन्याच राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात आणि खासकरून होम ग्राउंडवर होणाऱ्या पंजाब किंग्सविरुद्धचा सामना जिंकणं भाग आहे. पण यावेळी नाणेफेकीने चेन्नई सुपर किंग्सला काही साथ दिली नाही. त्यामुळे वाटेला प्रथम फलंदाजी आली. संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड ही जोडी मैदानात उतरली. पण संघाच्या 14 धावा असताना संजू सॅमसनच्या रूपाने पहिला धक्का बसला. त्यामुळे संघ अडचणीत आला होता. असं असताना आयुष म्हात्रेने संघाचा डाव सावरला. त्याच्या आक्रमक खेळीमुळे पावरप्लेमध्ये 57 धावा आल्या. तो इतक्यावरच थांबला नाही तर पुढेही त्याने आक्रमक बाणा कायम ठेवला आणि पहिल्या सामन्यातील जखम भरून काढली. त्याला पहिल्या सामन्यात खातं खोलता आलं नव्हतं. गोल्डन डकवर बाद झाला होता म्हणून निराश झाला होता. पण या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी करून कमाल केली.

आयुष म्हात्रेने 29 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 190 पेक्षा अधिकचा होता. त्याने अर्धशतकाच्या वेशीवर असताना षटकार मारला आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलं. खरं तर संजू सॅमसन बाद झाल्यानंतर आयुष म्हात्रेवर प्रेशर होतं. पण त्याने दबाव झुगारून नैसर्गिक खेळ केला आणि संघाला सावरलं. त्याचा झंझावात पाहून पंजाब किंग्सचे गोलंदाज हतबल झाल्याचं पाहायला मिळालं. वैभव सूर्यवंशी 43 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकार मारून 73 धावांवर बाद झाला. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 169.77 चा होता. विजयकुमार विशाकच्या गोलंदाजीवर फटका मारताना चुकला आणि युजवेंद्र चहलने त्याचा झेल पकडला.

आयुष म्हात्रे 19 वर्षे पूर्ण होण्याआधीच आयपीएलमध्ये दुसरं अर्धशतक ठोकलं आहे. यासह या यादीत संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. वैभव सूर्यवंशीने आयपीएल स्पर्धेत 3 अर्धशतक ठोकली आहे. तर 19 वर्षापेक्षा कमी वय असताना पृथ्वी शॉ आणि आयुषने प्रत्येकी 2 अर्धशतकं ठोकली आहे. आयुष म्हात्रेचं वय 18 वर्षेआणि 261 दिवस इतकं आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026: गुजरात टायटन्सच्या पहिल्या विजयावर विरजन, कर्णधार शुबमन गिलला बसला मोठा फटका
  • ‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओकचे बाबा खलनायकानंतर बनणार सज्जन ‘पुरुषोत्तम’
  • काळ्या केसांसाठी कोणत्याही हेअर कलरची गरज नाही….! ‘या’ तेलांचा आठवड्यातून 2 वेळा वापरा
  • ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स, ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी, फीचर्स, किंमत जाणून घ्या
  • KKR vs LSG Toss : लखनौचा फिल्डिंगचा निर्णय, केकेआरमध्ये मॅचविनर परतला, विजयाचं खातं उघडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in