• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 : CSKची पराभवाची हॅटट्रिक, रडकुंडीला आलेल्या कॅप्टन गायकवाडने कोणावर फोडलं पराभवाचं खापर ?

April 9, 2026 by admin Leave a Comment

IPL 2026 ची सुरूवात होऊन आठवडा उलूटन गेला तर एकेकाळी बराच दबदबा असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) संघाला काही सूर गवसलेला नाही. या मोसमासत चेन्नईचा लागोपाठ पराभव होत असून तकाल आरसीबी विरुद्धचा सामना हरल्यानंतर त्यांची पराभवाची हॅटट्रिक झाली. आरसीबीविरुद्ध सीएसकेची आघाडीची फळी सपशेल नाकाम ठरली आणि संघाला पुन्हा एकदा पराभवाची चव चाखावी लागली. सीएसकेच्या या निराशाजनक कामगिरीमुळे संघाचा कॅप्टन
ऋतुराज गायकवाड हा मात्र प्रचंड संतापला आहे. काल पराबवाची हॅटट्रिक झाल्यावर कॅप्टन गायकवाडच्या रागाच उद्रेक झाला. त्यानंतर त्याने या पराभवाला जबाबदार असलेल्या व्यक्तीचं नाव स्पष्टपणे घेत खापर त्याच्यावर फोडलं,

विशेष म्हणजे कालच्या आरसीबीविरुद्धच्या पराभवाबद्दल ऋतुराज गायकवाडने स्वत:च जबाबदारी घेतली. मी जर आणखी धावा केल्या असत्या, तर मॅचचा निकाल काही वेगळा लागला असता, पण मी तसं करून शकलो नाही, असं म्हणत त्याने स्वत:च्याच खेळीची चिरफाड करत अपयशाची जबाबदारी स्वीकारली. आरसीबीच्या टीममधील टिम डेविड (नाबाद 70), देवदत्त पडीक्कल (50 रन) यांच्या शानदार खेळीनंतर संघातील गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी करत सीएकेला 43 धावांनी हरवत सलग दुसरा विजय मिळवला.

काय म्हणाला ऋतुराज गायकवाड ?

“खरं सांगायचं तर, संघाच्या कामगिरीने मला थोडं आश्चर्य वाटलं. सरफराज खान, प्रशांत वीर आणि जेमी ओव्हरटन यांनी उत्तम खेळी करून दाखवली. मला वाटतं, जर मी डावाच्या सुरुवातीला धावा केल्या असत्या, तर आम्ही लक्ष्य गाठू शकलो असतो. त्यामुळे, आजच्या पराभवाची जबाबदारी मी घेतो. विराट कोहलीने क्षेत्ररक्षणात सोडलेला झेल आणि टीम डेव्हिडच्या आक्रमक फलंदाजीने सामन्याचे चित्रच पालटले. 14 व्या षटकापर्यंत आम्ही सामन्यात टीकून होतो, पण त्यानंतर झालेल्या चुकांमुळे सामना हातातून निसटला” असं पराभवानंतर ऋतुराज गायकवाड म्हणाला.

कालच्या सामन्यात कॅप्टन ऋतुराज गायकवाडने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि आरसीबीचा संघ फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. डेव्हिड आणि पडिक्कल यांच्या नाबाद 48 धावा, कर्णधार रजत पाटीदारच्या नाबाद 48 धावा आणि फिल सॉल्टच्या 46 धावांच्या जोरावर आरसीबीने तीन विकेट्स गमावून 250 धावांचा डोंगर उभा केला. पडिक्कल (29 चेंडू, पाच चौकार, दोन षटकार) आणि डेव्हिड (25 चेंडू, तीन चौकार, आठ षटकार) यांनी स्फोटक फटकेबाजी करत सीएसकेच्या गोलंदाजांना चोपून काढलं. कर्णधार पाटीदारने 19 चेंडूंच्या खेळीत एक चौकार आणि सहा षटकार ठोकत 48 धावा केल्या. तर सॉल्टने आपल्या 30 चेंडूंच्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार मारले.

सीएसकेची खेळी

मात्र त्यांना प्रत्युत्र देताना, आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या घसरणीतून सावरण्यात सीएसकेचा संघ अपयशी ठरला. सरफराज खानने 50 धावा करूनही, 19.4 षटकांत संघ अवघ्या 207 धावांवर ऑलआऊट झाला. सरफराज व्यतिरिक्त, प्रशांत वीरने 43 आणि जेमी ओव्हरटनने 37 धावा केल्या. आरसीबीसाठी भुवनेश्वर कुमार सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने 4 षटकांत 41 धावा देऊन तीन विकेट्स टिपल्या. जेकब डफी, कृणाल पांड्या आणि अभिनंदन सिंग यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. सुयश शर्माने 1 बळी घेतला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा एका झटक्यात होईल दूर, फक्त सात दिवस करा हा सोपा उपाय
  • डास पुन्हा घरात येणारच नाहीत, 5 रुपयांच्या टोमॅटोचा करा हा सोपा उपाय, आता उन्हाळ्यात बिनधास्त खिडक्या उघड्या ठेवा
  • सूर्य-बृहस्पति दृष्टी योगामुळे या 4 राशींचा खेळ बिघडणार, आयुष्यात नेमकं काय काय घडणार?
  • Todays Gold rate: हवी ती बातमी आलीच! युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…
  • IPL 2026, RR vs RCB: आयपीएल स्पर्धेतील राजस्थान विरूद्ध आरसीबी सामना, कोणाचं पारडं जड?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in