• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 : 3 संघांची 18 वर्षांपासून चॅम्पियन होण्याची प्रतिक्षा कायम, आरसीबीनंतर कोण उंचावणार ट्रॉफी?

March 25, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या 19 व्या मोसमासाठी एकूण 10 संघांनी आतापर्यंत जोरदार सराव केला आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे या स्पर्धेच्या मोसमातील 2 यशस्वी संघ आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 5-5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. एका बाजूला या 2 संघांनी 5-5 वेळा ट्रॉफी उंचावली आहे. तर दुसऱ्या बाजूला असे काही संघ आहेत ज्यांची गेल्या 18 वर्षांपासून आयपीएल चॅम्पियन होण्याची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळे यंदा या तिघांपैकी कोणता संघ आपली प्रतिक्षा संपवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

3 संघांची आयपीएल ट्रॉफीची प्रतिक्षा कायम

लखनौ सुपर जांयट्स, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स या 3 संघांना आतापर्यंत एकदाही आयपीएल चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवता आलेला नाही. या 3 संघांप्रमाणे आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमचीही गेल्या 17 मोसमापासून आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न होतं. आरसीबीचं हे स्वप्न 18 व्या मोसमात पूर्ण झालं. रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आरसीबीने 18 वर्षांची प्रतिक्षा संपवली. त्यामुळे यंदा या तिघांपैकी कोणता संघ आरसीबीप्रमाणे प्रतिक्षा संपवण्यात यशस्वी ठरतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटतं? कामात लक्ष लागत नाही? मग करा हा सोपा उपाय
  • Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? कर्ज वाढलंय? मग वास्तुशास्त्रामधील हा उपाय कराच
  • Chanakya Niti : तुम्हाला जर या सवयी असतील तर आयुष्यात कधी पैशांची कमी भासणार नाही, चाणक्य काय सांगतात?
  • काळी मिरीच्या ‘या’ उपायांनी तुमचं नशिब चमकणार…. एका क्लिकवर जाणून घ्या
  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in