• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 : 19 व्या मोसमापासून सामन्याच्या वेळेत बदल? दुपारी-संध्याकाळी मॅच किती वाजता सुरु होणार?

March 13, 2026 by admin Leave a Comment

बीसीसीआयकडून अखेर आयपीएलच्या बहुप्रतिक्षित 19 व्या मोसमाचं (IPL 2026) वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आगामी 4 राज्यांमधील विधानसभा निवडणुकींमुळे बीसीसीआयने या 19 व्या मोसमातील पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार एकूण 10 संघ 16 दिवसांत 20 सामने खेळणार आहेत. या 20 सामन्यांमध्ये 4 डबल हेडरचा (एका दिवशी 2 सामने) समावेश आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक संघांना किमान 3 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम झाल्यानंतर उर्वरित वेळापत्रकही जाहीर करणार, अशी माहिती बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माहिती दिली आहे.

बीसीसीआय उपाध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत उर्वरित वेळापत्रकाचं चित्र स्पष्ट होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आता एकूण 10 संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. टीम मॅनेजमेंट आणि खेळाडू तयारीला लागले आहेत. काही फ्रँचायजीकडून नवी जर्सीचं अनावरण करण्यात आलं आहे. मोसमातील पहिल्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 2 हात करणार आहे. हा सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. या निमित्ताने या मोसमात दुपारी आणि संध्याकाळी होणाऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे जाणून घेऊयात.

19 व्या मोसमातील पहिला सामना किती वाजता?

19 व्या मोसमातील सलामीचा सामना शनिवारी होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे. त्यानंतर सोमवार ते शुक्रवार असे सलग 5 दिवस दररोज 1 सामना होणार आहे. त्यानंतर शनिवारी डबल हेडरचा थरार रंगणार आहे. शनिवारी 4 एप्रिल आणि रविवारी 5 एप्रिलला डबल हेडरचा ‘रन’संग्राम पाहायला मिळणार आहे. संध्याकाळी सुरु होणारे सामने रात्री 11 ते 11.30 दरम्यान खेळवण्यात येतील. तर डबल हेडरच्या दिवशी सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. तर 3 वाजता टॉस होईल.

19 व्या हंगामातील पहिल्या फेरीचं वेळापत्रक

🚨 News 🚨

Presenting the schedule for the first 20 matches of #TATAIPL 2026, to be played from March 28 to April 12, 2026 🗓

Full schedule will be announced once poll dates are announced for three states set to undergo State Assembly elections.

More details ▶… pic.twitter.com/8Iq492v8TE

— IndianPremierLeague (@IPL) March 11, 2026

सामने कुठे पाहायला मिळतील?

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील सामने टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळतील? याबाबत आपण जाणून घेऊयात. आयपीएलचे सर्व सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळतील. तसेच मोबाईल/टीव्ही आणि लॅपटॉपवर जिओ हॉटस्टार एपद्वारे लाईव्ह मॅचचा थरार अनुभवता येईल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Karuna Munde | करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने संधी दिली तर…
  • Karuna Munde | करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने संधी दिली तर…
  • Egg Production India : भारतातील कोणतं राज्य अंडी उत्पादनात नंबर 1? जगात अंड्यांच्या उत्पादनात भारत कितव्या स्थानावर?
  • Supriya Sule On Baramati Election | रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
  • IPL 2026: महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? आता नवीन तारीख आली समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in