• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: हा तर फुसका बार निघाला, 25 कोटी घेणारा कमॅरुन ग्रीन पहिल्या 3 सामन्यात फ्लॉप

April 7, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल स्पर्धेच्या प्रत्येक मोसमात काही खेळाडूंना तगडा भाव मिळतो. मात्र त्यापकैी 1 खेळाडू सर्वात महागडा ठरतो. सर्वाधिक भाव मिळाल्याने या खेळाडूच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असतं. मात्र क्वचितच महागड्या खेळाडूंना प्राईज टॅगला साजेशी कामगिरी करता आली आहे. या 19 व्या मोसमातील खेळाडूही आतापर्यंत प्राईज टॅगला शोभेल अशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. (Photo Credit: PTI)

Cameroon Green and Shardul Thakur KKR vs MI

आयपीएलच्या 19 व्या मोसमाआधी झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन याला सर्वाधिक भाव मिळाला. मात्र कॅमरुनला या मोसमात आतापर्यंत काही खास करता आलं नाहीय. (Photo Credit: PTI)

KKR Cameroon Green

कॅमरुन ग्रीनसाठी केकेआरने तब्बल 25 कोटी 20 लाख रुपये मोजून त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. कॅमरुन यासह स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला. (Photo Credit: PTI)

KKR Cameroon Green and Ryan Rickelton

कॅमेरुनने 19 व्या मोसमातील 3 सामन्यांत फक्त 25 धावा केल्या. कमॅरुनला मुंबई विरुद्ध आश्वासक सुरुवात मिळाली. मात्र मुंबईच्या गोलंदाजाने कॅमरुनला 18 रन्सवर आऊट केलं. कॅमरुनला त्यानंतरच्या 2 सामन्यांत दुहेरी आकडाही गाठता आला नाही. कॅमरुनने हैदराबाद विरुद्ध 2 आणि पंजाब विरूद्धच्या सामन्यात 4 धावा केल्या. (Photo Credit: PTI)

IPL 2026 Cameroon Green and Ryan Rickelton

केकेआरला या मोसमात आणखी 11 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे कॅमरुनला आपला तडाखा दाखवण्याची संधी आहे. त्यामुळे कॅमरुन कमबॅक करुन केकेआरला अपेक्षित कामगिरी करतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Photo Credit: PTI)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 2009 च्या या चित्रपटापुढे बाहुबली, पुष्पा आणि RRR चित्रपट फेल, कमाई पाहून हादरले होते बॉलिवूड कलाकार
  • LPG सिलेंडर विकत घेताना विसरू नका हे 3 ‘गोल्डन रूल्स’, घाईघाईत कराल मोठी चूक
  • उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमच्या मुलांना हुशार जबाबदार आणि आत्मविश्वासू बनतील ‘या’ लाईफ स्किल्स
  • शिमला-मनालीला टक्कर देतात भारतातील ही 4 हिल स्टेशन, पर्यटकांना मिळते शांतता आणि समाधान
  • DC vs GT: गुजरात टायटन्ससमोर फॉर्मात असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान, आकडेवारी काय सांगते?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in