• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: हर्षित राणाची जागा भरून काढण्यासाठी केकेआरकडे तीन पर्याय, कोणाची निवड होणार?

March 22, 2026 by admin Leave a Comment

IPL 2026, Harshit Rana Replacement KKR: आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्स संघाचे धाबे दणाणले. बांगलादेशातील वाढत्या हिंसाचारामुळे बांगलादेशी खेळाडूंना संघातून काढण्यासाठी दबाव वाढला होता. त्यात बीसीसीआयच्या आदेशानंतर मुस्तफिझुर रहमानला काढावं लागलं. त्याच्या जागी झिम्बाब्वेचा ब्लेसिंग मुजरबानी याला संघात घेतलं आहे. ही जखम भरून निघत नाही तोच आणखी एक फटका केकेआर संघाला बसला. वेगवान गोलंदाज हर्षित राणा या स्पर्धेला मुकणार हे स्पष्ट झालं. त्यामुळे त्याची जागा भरून काढण्यासाठी धावाधाव सुरू झाली. संघाचा आघाडीचा गोलंदाज खेळणार नसल्याने त्याची जागा भरून काढणं फ्रेंचायझीला डोकेदुखी ठरणार आहे. केकेआरचं गोलंदाजीचं गणित यामुळे बिघडलं. अशा स्थितीत स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक असताना फ्रेंचायझीने त्याची जागा भरून काढण्यासाठी गोलंदाजाचा शोध सुरू केला आहे. यासाठी टीम मॅनेजमेंटने काही गोलंदाजांची चाचणी घेतली.

हर्षित राणाची जागा भरून काढण्यासाठी केकेआरची नजर अनुभवी वेगवान गोलंदाजांवर आहे. यात सिमरजीत सिंह, केएम आसिफ आणि संदीप वॉरियर हे तीन पर्यात असणार आहे. या तिघांना चाचणी बोलवण्यात आलं होतं. त्यामुळे या तिघांपैकी एकाची निवड केली जाणार आहे. सिमरजीत सिंह यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबादसाठी खेळला आहे. त्याने आयपीएलच्या 14 सामन्यात 11 विकेट घेतल्या. शरीरयष्टीने उंच असलेला सिमरजीत सिंह 140 किमी प्रती तासाने गोलंदाजी करतो. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना 10 सामन्यात 9 विकेट आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना 2 विकेट काढल्या.

केएम आसिफ हा दुसरा वेगवान गोलंदाज असून 32 वर्षांचा आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत जबरदस्त कामगिरी केली होती. 140 किमी प्रती तास वेगाने चेंडू टाकतो. पण दुखापतीमुळे वारंवार त्रस्त असतो. त्याने सीएसकेसाठी 2018 मध्ये डेब्यू केलं. तर 2023 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी शेवटचा सामना खेळला. दुसरीकडे, संदीप वॉरियल केकेआरसाठी खेळला आहे. त्याने 2019 मध्ये केकेआरसाठी डेब्यू केलं होतं. तीन पर्व या फ्रेंचायझीकडून खेळला. त्यानंतर गुजरात टायटन्सच्या ताप्यात गेला. त्याने 10 सामन्यात 8 विकेट घेतल्या.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराण युद्ध थांबताच भारताचा मोठा खेळ, भारताचे 3 धुरंधर थेट विदेशात, निर्णय घेत..
  • मुंबईकरांच्या प्रवासात अडथळे, रेल्वेकडून मेगाब्लॉकची घोषणा, कधी, कोणत्या गाड्या रद्द?
  • मोठी बातमी! इराणकडून भारताला दणका, त्या एका निर्णयाने हाहाकार, आता भारताला..
  • विवोचा हा 9020mAh बॅटरी असलेला सर्वात पातळ फोन भारतात या दिवशी होणार लाँच, जाणून घ्या तारीख
  • Horoscope Today 10th April 2026 : आजचा दिवस दणदणीत जाणार… या राशींच्या लोकांसाठी मोठी खूशखबर; फक्त…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in