• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 स्पर्धेपूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का, मॅच विनर खेळाडूने घेतली माघार

March 26, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी बऱ्याच घडामोडींना वेग आला आहे. देशात विधानसभा निवडणुका होणार असल्याने पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. असं असताना काही खेळाडूंच्या माघारीमुळे आयपीएल फ्रेंचायझींना धक्का बसला आहे. असं असताना दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण या स्पर्धेपूर्वी कागदावर हा संघ मजबूत दिसत होता. पण या स्पर्धेपूर्वी दोन मोठे धक्के बसले आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क या स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात खेळणार नसल्याचं समोर आलं आहे. कारण अजूनही त्याच्याबाबत निश्चित अपडेट समोर आलेली नाही. दुसरीकडे, या स्पर्धेपूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मॅच विनर खेळाडूने माघार घेतली आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचे धाबे दणाणले आहेत. कारण त्याची रिप्लेसमेंट ऐनवेळी शोधणं कठीण जाणार आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या जेतेपदाच्या स्वप्नांना सुरूंग लागण्याची शक्यता आहे.

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर बेन डकेटने माघार घेतली आहे. त्यामुळे फ्रेंचायझीला धक्का बसला आहे. त्याने आपलं संपूर्ण लक्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर करण्याचं निश्चित केलं आहे. खरं तर त्याला ही बाब मेगा लिलावातच कळायला हवी होती. पण त्याने लिलावात भाग घेतला आणि त्याच्यासाठी फ्रेंचायझीने 2 कोटी रुपयेही मोजले होते. त्यामुळे दिल्ली फ्रेंचायझीला आता प्लेइंग 11 ठरवताना नाकी नऊ येणार आहेत. दुसरीकडे, या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर बेन डकेटने दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीची माफी मागितली आहे.

बेन डकेट यावर स्पष्टीकरण देताना म्हणाला की, “मला यावर्षी आयपीएलमधून माघार घेण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागत आहे. मी यावर खूप विचार केला आणि हे अजिबात सोपे नव्हते. इंग्लंडकडून खेळणे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न आहे आणि मला इंग्लिश क्रिकेटसाठी माझे सर्वस्व द्यायचे आहे. हे साध्य करण्यासाठी, मला माझी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती टिकवून ठेवली पाहिजे. यासाठी मी दिल्ली कॅपिटल्सची माफी मागतो. मी या संधीसाठी खूप उत्सुक होतो. मला सर्व चाहत्यांचीही माफी मागायची आहे.”

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत
  • ‘या’ तारखेला साजरी होणार अक्षय्य तृतीया , पूजेचा मुहूर्त आणि सोने खरेदीची वेळ माहित्ये का ?
  • Vastu Shastra : घरात बरकत नाहीये? मग आर्थिक स्थैर्यासाठी करा हा सोपा उपाय
  • नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in