• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 स्पर्धेपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं, झालं असं की…

March 19, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी सुमार राहिली होती. त्यामुळे यंदाच्या पर्वात पु्न्हा एकदा जोमाने उतरण्याची तयारी चेन्नई सुपर किंग्सने केली आहे. यासाठी ट्रेड विंडोच्या माध्यमातून चेन्नई सुपर किंग्स संजू सॅमसनला संघात घेतलं आहे. त्याचा सध्या फॉर्म पाहता हा निर्णय योग्यच आहे असं म्हणायला हरकत नाही. असं असताना चेन्नई सुपर किंग्सला एक मोठा धक्का बसला आहे. कारण स्पर्धेला फक्त 9 दिवसांचा अवधी शिल्लक असताना गोलंदाजीचा मारा कमकुवत होताना दिसत आहे. रिपोर्टनुसार, चेन्नई किंग्सच्या ताफ्यात असलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नाथन एलिस दुखापतीमुळेय संपूर्ण स्पर्धेला मुकला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या पुढच्या रणनितीला धक्का बसला आहे. आता त्याची रिप्लेसमेंट शोधण्याची धावाधाव करावी लागणार आहे.

स्पोर्टस्टारच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नाथन एलिस हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे स्पर्धा संपल्यानंतरही सावरणं कठीण आहे. अशा स्थितीत त्याला या स्पर्धेला मुकावं लागलं आहे. या वृत्तात सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी या बातमीला दुजोरा दिल्याचं सांगितलं आहे. इतकंच काय तर संघासाठी मोठा धक्का असल्याचं नमूद केलं. कारण मेगा लिलाव प्रक्रिया 2025 मध्ये पार पडली होती. तेव्हा 2 कोटींच्या मूळ किंमतीत त्याला संघात घेतलं होतं. पण आयपीएल 2025 स्पर्धेत फक्त एक सामना खेळला आणि एकच विकेट घेतली होती.

चेन्नई सुपर किंग्सचा संघ पाहिला तर संघात फलंदाजांची काही कमी नाही. पण अनुभवी गोलंदाज असणं खूपच महत्त्वाचं आहे. अशा स्थितीत नाथन एलिसचं स्पर्धेतून आऊट होणं चेन्नई सुपर किंग्सला परवडणारं नाही. नाथन एलिसला या पर्वासाठी त्यांनी रिटेनही केली होती. त्यामुळे त्याची ताकद काय आहे याचा अंदाज फ्रेंचायझीला होता. आता ऐनवेळी चेन्नई सुपर किंग्सला त्या ताकदीचा गोलंदाज शोधावा लागणार आहे. त्याच्या ऐवजी संघात कोणाला संधी मिळणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in