• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 स्पर्धेत हा संघ पहिल्यांदा जेतेपद पटकावणार? स्पर्धेपूर्वीच कर्णधाराचा दावा

March 20, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचं पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. असं असताना जेतेपदाचा मानकरी कोण? याबाबत आतापासूनच खलबतं सुरू आहेत. मागच्या वर्षी आरसीबीने जेतेपद पटकावलं होतं. 18 वर्षानंतर जेतेपदाचा मान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मिळाला होता. मात्र यंदा नवा मानकरी असेल की जुना याबाबत काही सांगता येत नाही. कारण दहाही संघांनी मजबूत बांधणी केली आहे. त्यामुळे या स्पर्धेचं जेतेपद कोण मिळवणार हे काही आता सांगता येणार नाही. असं असताना पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, त्याला आव्हानं आवडतात आणि त्याची नजर यावेळी चषकावर असणार आहे. मागच्या वर्षी पंजाब किंग्सने अंतिम फेरी गाठली होती. पण जेतेपदाचं स्वप्न भंगलं होतं.

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने मोहालीत संघाची नवी जर्सी लाँच केली. यावेळी त्याने स्पष्ट सांगितलं की, पंजाब किंग्स संघाकडून यंदा खूप अपेक्षा आहेत. ते मजेशीर असणार आहे. श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आशा खूप जास्त आहेत आणि यातच खरी मजा आहे. मला आव्हानं आवडतात. पण सर्वात महत्त्वाची गोष्टी अशी की जेव्हा आम्ही मैदानात उतरतो तेव्हा जिंकायचंच असतं. माझी नजर फक्त ट्रॉफीवर आहे.’ दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने कमबॅक केलं आहे. त्यावर श्रेयस अय्यर म्हणाला की, माझं वजन जवळपास 7 किलोने घटलं होतं. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी मला मेहनत घ्यावी लागली. मला आव्हान आवडतात आणि मी माझ्या आयुष्यातील कठीण काळ पार केला आहे. आता मी आत्मविश्वासाने संघाचं नेतृत्व करण्यास परतलो आहे.

कर्णधार श्रेयस अय्यरसोबत या कार्यक्रमात अर्शदीप सिंगही होता. त्याने सांगितलं की, ‘जेव्हा तुमच्यावर दबाव असतो तेव्हा आपलं भाग्यच असतं. तेव्हा चाहत्यांकडून अधिक समर्थन मिळतं. त्यामुळे आनंद वाढतो. जेव्हा चाहते तुम्हाला प्रोत्साहन देतात तेव्हा असं वाटतं की 30 हजार लोकं एकत्र धावत आहेत. आम्ही या वर्षी सर्व होम मॅचेस जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करू.’

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इलेक्ट्रिक किटली मध्ये फक्त चहा आणि कॉफीच नाही तर ‘हे’ पदार्थ देखील काही मिनिटांमध्ये होतात तयार
  • Sanjay Raut : शिंदेंच्या पक्षाचीच डेडबॉडी झालीय, फडणवीसांकडून ऑपरेशन सुरू – ‘ऑपरेशन टायगर’वरून राऊतांचा घणाघात
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात मोठा कलह, थेट पत्नीनेच ट्रम्प यांच्याविरोधात धक्कादायक…
  • लग्नासाठी मुसलमान झाली… वयाच्या 23 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय… आज कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?
  • उत्तम बॅटरी पॉवर आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या वनप्लस नॉर्ड 6 ची किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in