• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 स्पर्धेत युवराज सिंगचे 7 शिष्य उतरणार, अभिषेक-ऋषभसह या खेळाडूंची गोलंदाजांमध्ये दहशत

March 22, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेचं बिगुल वाजलं असून या स्पर्धेत कोणता खेळाडू चमकदार कामगिरी करणार याकडे लक्ष लागून आहे. खासकरून युवराज सिंगच्या तालमीत घडलेल्या खेळाडूंकडे लक्ष असणार आहे. आयपीएल स्पर्धेत युवराज सिंगने ट्रेनिंग दिलेल्या 7 खेळाडूंचा समावेश आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत (Photo: Instagram)

अभिषेक शर्मा या यादीत आघाडीवर आहे. त्याच्या आक्रमक खेळीने त्याने लक्ष वेधून घेतलं आहे. युवराज सिंगने ट्रेनिंग दिल्यानंतर मागच्या आयपीएल पर्वात त्याच्या फलंदाजीची धार दिसून आली आहे. इतकंच काय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याने आक्रमक बाणा दाखवला आहे. आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादकडून मैदानात उतरणार आहे. (Photo- IPL/BCCI)

टीम इंडियाचा वनडे आणि कसोटी कर्णधार शुबमन गिलही युवराज सिंगचा शिष्य आहे. युवराजच्या तालमीत त्यालाही फलंदाजीचं बाळकडू मिळालं आहे. त्याच्यासाठी आयपीएल 2026 स्पर्धा खूपच महत्त्वाची आहे. कारण टी20 संघातील त्याची जागा त्याने गमावली आहे. नाही तर खूपच कठीण होईल. (Photo- IPL/BCCI)

युवराज सिंगच्या छत्रछाया संजू सॅमसनलाही लाभली आहे. तसं पाहिलं संजू सॅमसनचा पंजाब क्रिकेटशी तसा काही संबंध नाही. ना कधी आयपीएल स्पर्धेत एका संघाकडून खेळले आहेत. पण संजू सॅमसनने सांगितलं की युवराजने त्याची मदत केली होती. वर्ल्डकपपूर्वी युवराज सिंगने त्याला फलंदाजीचे काही धडे शिकवले होते. त्याचा फायदा त्याला झाला. (Photo- Chennai Super Kings/ Facebook)

युवराज सिंगच्या छत्रछाया संजू सॅमसनलाही लाभली आहे. तसं पाहिलं संजू सॅमसनचा पंजाब क्रिकेटशी तसा काही संबंध नाही. ना कधी आयपीएल स्पर्धेत एका संघाकडून खेळले आहेत. पण संजू सॅमसनने सांगितलं की, युवराजने त्याची मदत केली होती. वर्ल्डकपपूर्वी युवराज सिंगने त्याला फलंदाजीचे काही धडे शिकवले होते. त्याचा फायदा त्याला झाला. (Photo- Chennai Super Kings/ Facebook)

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी ऋषभ पंतला युवराज सिंगचं मार्गदर्शन लाभलं. ऋषभ पंतने युवराजसोबत काही काळ सरावही केला.त्याचे व्हिडिओ स्वतः लखनौ सुपर जायंट्सच्या कर्णधाराने पोस्ट केले होते. या पर्वात पंतने काही विशेष कामगिरी केली तर त्यात युवराजच्या मार्गदर्शनाची भूमिका असणार हे नक्की...(फोटो- PTI)

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी ऋषभ पंतला युवराज सिंगचं मार्गदर्शन लाभलं. ऋषभ पंतने युवराजसोबत काही काळ सरावही केला.त्याचे व्हिडिओ स्वतः लखनौ सुपर जायंट्सच्या कर्णधाराने पोस्ट केले होते. या पर्वात पंतने काही विशेष कामगिरी केली, तर त्यात युवराजच्या मार्गदर्शनाची भूमिका असणार हे नक्की…(फोटो- PTI)

पंजाब क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज प्रभसिमरन सिंग यालाही गेल्या दोन-तीन वर्षांपासून युवराज सिंग क्रिकेटचे धडे शिकवत आहे. पंजाब किंग्ससाठी त्याने मागच्या पर्वात चांगली कामगिरी केली. पंजाबला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात प्रभसिमरनने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता  पुन्हा एकदा पंजाबला विजेतेपद मिळवून देण्यासाठी तशीच कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.(फोटो- PTI)

युवराज सिंगने  दिल्लीच्या प्रियांश आर्यालाही फलंदाजी सुधरवण्यात मदत केली आहे. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या सलामीवीर प्रियांश आर्याने मागील आयपीएल हंगामानंतर युवराज सिंगच्या अकादमीमध्ये काही काळ घालवला होता. त्यानंतर प्रियांशने दिल्ली संघासाठी काही चांगल्या खेळी केल्या. पण त्याची खरी कसोटी आता आयपीएलमध्ये लागणार आहे. (फोटो- PTI)

अर्जुन तेंडुलकरसाठी आयपीएल पर्व महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई इंडियन्ससोबत असताना चार पर्वात फारशा संधी मिळाल्या नाहीत.  यावेळी लखनौ सुपर जायंट्सकडून मैदानात उतरणार आहे. या संघात त्याला नियमित संधी मिळू शकते. त्यामुळे हे पर्व सुरु होण्यापूर्वीच अर्जुनने युवराज सिंगकडून काही टिप्स घेतल्या आहेत. (फोटो- PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ashok Kharat: अशोक खरात याचा जीव घाबराघुबरा, सर्व यंत्रणाच मागे लागल्या, ती मोठी अपडेट काय?
  • लग्नाआधी नवरीला बोलावलेलं, अशोक खरातचं आतापर्यंतच सर्वात घाणेरडं सत्य समोर
  • इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, थेट म्हटले, सहमत असो वा नसो आम्ही..
  • एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, ठाकरेंचे 8 खासदार फोडणार, नावही ठरली, मध्यरात्रीची मोठी घडामोड
  • जेठालाल ते बबिता.. ‘तारक मेहता..’च्या कलाकारांनी जमवली इतकी संपत्ती; कोण सर्वांत श्रीमंत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in