• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

April 11, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 स्पर्धेतील 18 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आणि कर्णधार अक्षर पटेल याने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सलग तीन पराभवातून धडा घेत चेन्नई सुपर किंग्सने सावध सुरूवात केली. तसेच 20 षटकात 2 गडी गमवून 212 धावा केल्या आणि विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघ 189 धावा करू शकला. हा सामना चेन्नई सुपर किंग्सने 23 धावांनी जिंकला. दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करून चेन्नई सुपर किंग्सने स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली आहे.  तर दिल्ली कॅपिटल्सचा या स्पर्धेतील दुसरा पराभव ठरला.

दिल्ली कॅपिटल्सचा डाव

आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून धावांचा पाठलाग करण्यासाठी पाथुम निसंका आणि केएल राहुल ही जोडी मैदानात उतरली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. पण केएल राहुल 18 धावा करून बाद झाला. लगेचच पाथुम निसंका 41 धावांची खेळी करून तंबूत परतला. त्यानंतर समीर रिझवी 6 धावा आणि अक्षर पटेल 1 धाव करून बाद झाल. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघावर दबाव वाढला. डेविड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सहाव्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. पण 17 धावांवर असताना डेविड मिलर जेमी ओव्हरटनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. आशुतोष शर्मा 19 धावा, तर अकिब नबी दार 4 धावांवर बाद झाला आणि पुन्हा दबाव वाढला. पण ट्रिस्टन स्टब्स एका बाजूने खिंड लढत होता. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्स सामन्यात राहिला. पण 60 धावांवर बाद झाला आणि सामना चेन्नई सुपर किंग्सच्या पारड्यात झुकला.

चेन्नई सुपर किंग्सचा डाव

चेन्नई सुपर किंग्सकडून संजू सॅमसन आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने सावध सुरूवात केली. पण संघाच्या 62 धावा असताना ऋतुराज गायकवाड बाद झाला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार मारण्याचा नादात झेल बाद झाला. त्याने 18 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 15 धावांची खेळी केली. त्यानंतर संजू सॅमसन आणि आयुष म्हात्रेची जोडी जमली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. संजू सॅमसनची शतकी खेळी या निर्णायक ठरली. तर आयुष म्हात्रेने 36 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार मारत 59 धावा केल्या. पण शेवटच्या दोन षटकांचा खेळ शिल्लक असताना त्याला रिटायर्ड आऊट होत जावं लागलं. त्यानंतर शिवम दुबे मैदानात आला आणि 10 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 20 धावा केल्या. तर संजू सॅमसनने 56 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकार मारत नाबाद 115 धावांची खेळी केली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत
  • घाणेरडी टाकी साफ करण्याची भन्नाट ट्रिक, आत न जाता होईल स्वच्छ, वापरा ही सोपी पद्धत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in