• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: सरफराज खानने आयपीएलमध्ये नोंदवला मोठा विक्रम, यापूर्वी असं कधीच घडलं नाही

April 9, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेत विक्रम रचणं आणि मोडणं आता काही नवीन राहिलेलं. काही दुर्मिळ विक्रम वगळता रोज नवे विक्रम रचले आणि मोडले जातात. अशाच एका दुर्मिळ विक्रमाची नोंद चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात झाली. आयपीएल 206 स्पर्धेच्या 11 व्या सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल चेन्नईच्या बाजूने लागला आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय चुकला म्हणावं लागेल. कारण आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 250 धावा केल्या. तसेच या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्स संघ 207 धावा करू शकला. चेन्नई सुपर किंग्सला या सामन्यात 43 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्याचा परिणाम चेन्नई सुपर किंग्सच्या रनरेटला बसला आणि गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानी आहेत. निकाल जरी आरसीबीच्या बाजूने लागला असला तरी सरफराज खानने एक विक्रमाची नोंद केली आहे.

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात पावर प्लेमध्ये चेन्नई सुपर किंग्सने तीन विकेट धडाधड गमावल्या. ऋतुराज गायकवाड, आयुष म्हात्रे आणि संजू सॅमसनची विकेट पडली. अशा स्थितीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सरफराज खानवर दबाव वाढला होता. पण त्याने आरसीबीच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. यासह त्याने अर्धशतक ठोकलं. यापूर्वी असं अर्धशतक कोणत्याही फलंदाजाला ठोकता आलं नव्हतं. त्यामुळे या अर्धशतकाची दुर्मिळ विक्रम म्हणून नोंद झाली आहे.

आरसीबीने दिलेल्या 250 धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सने 10 धावांत 2 गडी गमावले. चौथ्या क्रमांकावर क्षेत्ररक्षणासाठी आलेल्या सरफराज खानने स्फोटक फलंदाजी केली. आरसीबीच्या गोलंदाजांवर तुटून पडलेल्या सरफराजने अवघ्या 24 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह सरफराज खान आयपीएलच्या इतिहासात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पॉवरप्लेमध्ये अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी आयपीएल स्पर्धेत पहिल्या 6 षटकांमध्ये चौथ्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजाने अर्धशतक झळकावले नव्हते. यापूर्वी 2023 मध्ये मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्माने गुजरात टायटन्सविरुद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 43 धावा केल्या होत्या.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • KKR vs LSG Weather Report: पाऊस केकेआरची वाट लावणार, सलग दुसरा सामना रद्द होणार? हवामान कसं असणार?
  • इंडस्ट्रीमध्ये पहिली ऑनस्क्रिन किसिंग सीन देणारी अभिनेत्री, चित्रपट ठरलेला वादग्रस्त, भारतात चित्रपटावर बंदी
  • आधी 167 कोटींच्या पेंटिंगने चर्चा, पुनावाला यांच्या सुनेकडे आहे तब्बल 126 कोटींची गुलाबी हिऱ्याची अंगठी
  • samudrik shashtra : तुमच्या केसांच्या रंगावरून तुमचे व्यक्तीमत्व कसे कळते?
  • Hingoli | बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in