• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादचा पावर प्लेमध्ये आणखी एक विक्रम, केकेआरवर दुसऱ्यांदा ओढावली अशी वेळ

April 2, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 स्पर्धेत काही विक्रम रचले आणि मोडले जाणार हे निश्चित आहे. सनरायझर्स हैदराबाद संघातील बॅटिंग लाईनअप पाहिली तर या संघाकडून फार अपेक्षा आहेत. ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन आणि हेनरिक क्लासेनसारखी तगडे स्टार फलंदाज आहेत. त्यामुळे या संघाकडून अपेक्षा आहेत. पण असं असताना या स्पर्धेत हवी तशी सुरूवात झाली नाही. पहिल्या सामन्यात आरसीबीकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. असं असताना दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद पुन्हा एकदा नव्या उमेदीने उतरला आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा कोलकाता नाईट रायडर्सच्या बाजूने लागला. तसेच सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून सावध सुरूवात झाली. पण पावरप्लेमध्ये एका विक्रमाची नोंद केली. काय ते जाणून घ्या.

पावर प्लेच्या सहा षटकात काय घडलं?

आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादकडून ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा ही जोडी मैदानात उतरली. तर केकेआरने चेंडू वैभव अरोराच्या हाती सोपवला. ट्रेव्हिस हेड स्ट्राईकला होता. पहिले तीन चेंडू निर्धाव गेले. त्यानंतर 1 धाव घेत अभिषेक शर्माला स्ट्राईक दिली. त्यानेही एक धाव करत पुन्हा हेडला स्ट्राईक दिली. त्याने शेवटच्या चेंडूवर चौकार मारला आणि पहिल्या षटकात 6 धावा आल्या. दुसरं षटक टाकण्यासाठी मुझरबानी आला. पण या षटकात 22 धावा आल्या. वैभव अरोराच्या तिसऱ्या षटकात 21 धावा आल्या. चौथं षटक सुनील नरीनने टाकलं आणि फक्त 3 धावा दिल्या. पाचवं षटक टाकण्यासाठी वरूण चक्रवर्ती आला आणि या षटकात 25 धावा काढल्या. पावरप्लेच्या शेवटचं षटक कार्तिक त्यागीला दिलं. या षटकात 13 धावा आणि ट्रेव्हिस हेडची विकेट आली. पावरप्लेच्या सहा षटकात 84 धावा आल्या.

पावर प्लेमध्ये नोंदवला असा विक्रम

सनरायझर्स हैदराबादने पावर प्लेमध्ये पाचव्या क्रमांकाची सर्वोत्तम खेळी केली. आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 124 धावा केल्या होत्या. त्यानंतर याच वर्षी लखनौविरुद्ध 107 धाव केल्या. आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध 94, आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध 84 आणि आता केकेआरविरुद्ध 84 धावा केल्या. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सच्या नावावर पावरप्लेमधली ही दुसरी मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी पंजाब किंग्सने 2024 मध्ये याच मैदानात 93 धावा काढल्या होत्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पाकिस्तान आपटला तोंडावर, इराणकडून सर्वात मोठा दणका, जगापुढे थेट..
  • कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळत नाही, काळजी करु नका, रेल्वेकडून मोठी गुडन्यूज
  • तर लाडकी बहीण योजना रोखावीच लागेल – उच्च न्यायालयाकडून सरकारची कानउघडणी
  • तर लाडकी बहीण योजना रोखावीच लागेल – उच्च न्यायालयाकडून सरकारची कानउघडणी
  • Maharashtra News LIVE : लवकरच ‘ऑपरेशन टायगर’? दरेगावातून एकनाथ शिंदे सक्रीय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in