• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह आमनेसामने! टीम इंडियासाठी महत्त्वाचा सामना

April 8, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील 13व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येणार आहेत. हा सामना गुवाहाटीत म्हणजेच राजस्थान रॉयल्सच्या होमग्राउंडवर होणार आहे. यापूर्वी अनेक पर्वात हे दोन संघ भिडले आहेत. पण यावेळचा सामना खास असणार आहे. त्याला कारणही तसंच आहे. दोन संघात हा सामना होत असला तरी वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह या द्वंद्वाकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. कारण दोन्ही खेळाडू तोडीसतोड आहेत. वैभव सूर्यवंशीने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून आक्रमक पवित्रा दाखवला आहे. पण यावेळी समोर दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराह असणार आहे. जसप्रीत बुमराहचा सामना करणं भल्याभल्यांना जमलं नाही. आता 15 वर्षी वैभव सूर्यवंशी कसा सामना करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

काय म्हणाले कोच मनिष ओझा?

आयपीएल स्पर्धेत वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह यापूर्वी एकमेकांसमोर उभे ठाकले होते. पण  तेव्हा सामना झाला नव्हता. कारण तेव्हा दीपक चाहरने त्याला दुसऱ्या चेंडूवर तंबूत धाडलं होतं. पण आता वैभव सूर्यवंशी अनुभवासह मैदानात उतरणार आहे. असं असताना वैभव सूर्यवंशीसमोर जसप्रीत बुमराहचं आव्हान असणार आहे की टीम इंडियात येण्याची संधी? या प्रश्नावर वैभव सूर्यवंशीचे प्रशिक्षक मनिष ओझा यांनी टीव्ही 9 शी बोलताना उत्तर दिलं. मनिष ओझा यांनी सांगितलं की, वैभव आणि बुमराह समोरासमोर असतील तेव्हा चांगला सामना पाहायला मिळेल. बुमराहचा सामना करणं वाटतं तितकं सोपं नाही. तर वैभवला आक्रमक खेळायला आवडतं. अशा स्थितीत वैभवसमोर बुमराहचं आव्हान आणि संधी दोन्ही असेल.

मनिष ओझा यांनी सांगितलं की, वैभव सूर्यवंशीने बुमराहचा सामना प्रभावीपणे केला तर त्याला मोठी संधी मिळू शकते. या माध्यमातून वैभव दबावात चांगलं खेळू शकतो हे दाखवून देईल. तसेच जगभरातील गोलंदाजांचा सामना करण्यास सज्ज असल्याचं दाखवून देईल. वैभव आक्रमक खेळण्यास यशस्वी झाला तर निवडकर्त्यांचं लक्ष वेधून घेईल. तसेच टीम इंडियात खेळण्याची संधी मिळू शकते. असं असताना मनिष ओझा पुढे म्हणाले की, बुमराहला मोठे फटके मारणं सोपं नाही. वैभव सूर्यवंशीने बुमराहचा सामना कसा करावा? यावर भाष्य करताना मनिष ओझा म्हणाले की, ते पूर्णपणे वैभवच्या स्किल्स आणि मानसिक क्षमतेवर अवलंबून आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • US Iran Ceasefire : सीजफायरमुळे सगळं जग खुश पण अमेरिकेत बसलेला एक माणूस या निर्णयामुळे खूप दु:खी, ती व्यक्ती ट्रम्प नाही
  • ‘धुरंधर 2’च्या यशाबद्दल दीपिका पादुकोण गप्प का? अखेर स्वत:च दिलं उत्तर; ट्रोलरची बोलती केली बंद!
  • LPG Crisis: गॅस बुकिंगबाबत नवीन अपडेट, या ग्राहकांना 1 जुलैपासून मिळणार नाही सिलिंडर
  • सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिताय? तर ‘हे’ महत्त्वाचे नियम आजत जाणून घ्या, नाहीतर…
  • पोलियोच्या जाहिराती केल्या पण मुलाला पायावर उभं..; कॉमेडियनने अमिताभ बच्चन यांची उडवली खिल्ली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in