• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 : विराट कोहली ऑन फायर, 19 व्या मोसमाआधी चाबूक खेळी, आपल्याच गोलंदाजांची धुलाई

March 26, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाला आता अवघे काही तास बाकी आहेत. या नव्या हंगामाच्या थराराला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्याआधी 25 मार्चला सर्व 10 संघांचे कर्णधार एकत्र जमले. या कर्णधारांचं फोटोशूट झालं. आता हेच कर्णधार अवघ्या काही दिवसांनी एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. त्याआधी शेवटचे काही दिवस बाकी असताना खेळाडू जीव ओतून सराव करत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 19 व्या मोसमात गतविजेता म्हणून उतरणार आहे. त्यामुळे आरसीबीसमोर ट्रॉफी कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आरसीबी कशी कामगिरी करते याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

आयपीएलच्या 19 व्या मोसमाची लगबग सुरु असताना आरसीबीचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने धमाका केला आहे. विराटने सराव सामन्यात चाबूक खेळी केली. विराटने या खेळीसह प्रतिस्पर्धी संघाला आपण फटकेबाजी करण्यासाठी सज्ज असल्याचं जाहीर केलंय.

विराटची चाबूक बॅटिंग

विराटने या सराव सामन्यात आपल्या गोलंदाजांची धुलाई केली. विराटने 200 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने या सराव सामन्यात धावा केल्या. विराटने 19 बॉलमध्ये 45 रन्सची खेळी केली. विराटने या खेळीदरम्यान मैदानात चौफेर फटकेबाजी केली.

विराटकडून यंदाही तडाखा अपेक्षित

चाहत्यांना कोहलीकडून या मोसमातही विराट स्टाईल बॅटिंग अपेक्षित असणार आहे. विराट कोहली यंदाही फिलीप सॉल्टसह सलामीला बॅटिंगला येणार आहे. विराटने गेल्या 3 हंगामात आरसीबीसाठी बॅटिंगने प्रमुख योगदान दिलं आहे. विराटने गेल्या 3 मोसमात 600 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

विराटची फायर खेळी

𝗣𝗘𝗔𝗞ohli gearing up for another banger of a season. 😮‍💨🔥

DK talks about prep, intent, and the energy Virat’s bringing this season on @bigbasket_com presents RCB Bold Diaries. 🙌#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2026 pic.twitter.com/NpToH0uOeq

— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 25, 2026

विराटने गेल्या अर्थात 18 व्या मोसमात थोडेथोडके नव्हे तर 8 अर्धशतक झळकावले होते. विराट स्पर्धेच्या पहिल्या मोसमापासून आरसीबीसाठी खेळतोय. विराटने आयपीएल कारकीर्दीत 18 व्या मोसमापर्यंत 268 सामन्यांमध्ये 39.54 च्या सरासरीने एकूण 8 हजार 661 धावा केल्या आहेत.

आरसीबीचा पहिला सामना कधी आणि कुठे?

दरम्यान बीसीसीआयने एकूण 5 ठिकाणी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे 19 व्या मोसमातील पहिल्या 20 सामन्यांचंच वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, आरसीबी 19 व्या मोसमातील सलामीच्या सामन्यातच सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 2 हात करणार आहे. हा सामना 28 मार्चला बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटतं? कामात लक्ष लागत नाही? मग करा हा सोपा उपाय
  • Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? कर्ज वाढलंय? मग वास्तुशास्त्रामधील हा उपाय कराच
  • Chanakya Niti : तुम्हाला जर या सवयी असतील तर आयुष्यात कधी पैशांची कमी भासणार नाही, चाणक्य काय सांगतात?
  • काळी मिरीच्या ‘या’ उपायांनी तुमचं नशिब चमकणार…. एका क्लिकवर जाणून घ्या
  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in