• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: लाईव्ह सामन्यात झाली मोठी चूक, हैदराबादने जिंकलेला सामना लखनौच्या पारड्यात पडला! Video

April 9, 2026 by admin Leave a Comment

LSG vs SRH: आयपीएल स्पर्धेत प्रत्येक चेंडू, प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक धावेचं महत्त्व आहे. त्यामुळे एखादा निर्णय चुकलं तर पराभवाच्या वेशीवर जाऊन उभं राहावं लागतं. असंच काहीस लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्यात झालं. हा सामना लखनौ सुपर जायंट्सने 5 विकेट राखून जिंकला. तसेच या स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. पण हा निकाल काही वेगळा असू शकला असता. जर सनरायझर्स हैदराबादने तशी चूक केली नसती तर… सोप्या भाषेत सांगायचं तर जो सामना लखनौ सुपर जायंट्सने जिंकला, तो सामना सनरायझर्स हैदराबादने जिंकला असता. लखनौ सुपर जायंट्सच्या खेळाडूने विजयी फटक्यावर अपील केली असती.. तुम्ही म्हणाल की विजयी फटक्यावर काय अपील केली असती? लखनौ सुपर जायंट्सच्या खेळाडूने अशी कोणती मोठी चूक केली? वगैरे प्रश्न पडले असतील. शेवटच्या चेंडूवर कर्णधार ऋषभ पंतने चौकार मारला आणि विजय मिळवून दिला. मग झालं तरी काय? चला जाणून घेऊयात सविस्तर

नेमकं काय घडलं विजयी चौकारावर?

लखनौ सुपर जायंट्स संघाला शेवटच्या षटकात 9 धावांची गरज होती. जयदेव उनाडकट गोलंदाजी टाकण्यासाठी आला होता आणि समोर ऋषभ पंत होता. त्याने पहिल्या दोन चेंडूवर चौकार मारला. त्यामुळे 4 चेंडूत 1 धाव अशी स्थिती आली. त्यानंतर दोन चेंडू निर्धाव गेले. 2 चेंडूत 1 धाव अशी स्थिती आली. पाचव्या चेंडूवर ऋषभ पंतने चौकार मारला आणि विजय मिळवून दिला. पण लखनौ सुपर जायंट्सच्या आवेश खानकडून मोठी चूक झाली. या चुकीचं रुपांतर हैदराबादच्या विजयात झालं असतं. पण अपील न केल्याने फटका बसला आणि पराभव सहन करावा लागला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bitti Cricket Advice (@bitticricketadvice)

ऋषभ पंतने जयदेवच्या पाचव्या चेंडूवर विजयी चौकार मारला तेव्हा बाउंड्री बाहेर उभ्या असलेल्या आवेश खानने मोठी चूक केली. त्याने चेंडू बाउंड्री पर करण्यापूर्वीच चेंडू बॅटने अडवला. पण ही चूक सनरायझर्स हैदराबादच्या लक्षात आली नाही. आयसीसी कोड ऑफ कंडक्ट 20.1 नियमानुसार, नॉन फिल्डरने दखल दिल्यानंतर चेंडू निर्धाव दिला जाऊ शकतो. आयसीसीच्या नियम 41 नुसार ही कृती चुकीची मानली जाते. या बदल्यानंतर पंच सनरायझर्स हैदराबादला 5 धावांची पेनल्टी गिफ्ट करू शकले असते. जर असं झालं असतं तर शेवटच्या चेंडूवर लखनौला 6 धावा कराव्या लागल्या असत्या. शेवटच्या चेंडूवर षटकार मारणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादने हातातली संधी घालवली असं म्हणायला हकरत नाही.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Baramati News | ‘मी जड अंत:करणाने फॉर्म मागे घेतोय, माझ्यावर दबाव…’ आकाश मोरे काय म्हणाले?
  • आरे देवा! पैठणी साडीवर बिकिनी ब्लाऊज, बोल्ड अभिनेत्रीचा नवीन लूक पाहून सर्वांनाच बसला धक्का
  • Pakistan:…तर कलकत्यावर थेट हल्ला!पाकचा संरक्षण मंत्री बरळला, युद्धाला तोंड फुटणार?
  • तुमची जुनी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी बदलायची वेळ आली? नवीन फिचर्सचा असा घ्या फायदा
  • BSNLचा भन्नाट प्लॅन, 1 रुपयात मिळवा डेटा कॉलिंग, एसएमएससह सर्व काही…; जाणून घ्या फायदे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in