• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 : मुंबई इंडियन्सचा राजस्थान विरुद्ध कॅप्टन बदलणार! कोचने काय सांगितलं?

April 8, 2026 by admin Leave a Comment

मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात 2012 नंतर पहिल्यांदा आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. मुंबईने 29 मार्चला घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करुन विजयी सुरुवात केली. मात्र त्यानंतर मुंबई विजयी घोडदौड कायम ठेवण्यात अपयशी ठरली. मुंबईला शनिवारी आपल्या मोहिमेतील दुसऱ्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. दिल्ली कॅपिट्ल्सने 4 एप्रिलला मुंबईचा 6 विकेट्सने पराभव केला. मुंबईला दिल्ली विरूद्धच्या सामन्यात नियमित कर्णधार हार्दिक पंड्या याच्याशिवाय खेळावं लागलं.

हार्दिकला तब्येत बरी नसल्याने दिल्ली विरूद्धच्या सामन्याला मुकावं लागलं. अशात हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव याने पलटणचं नेतृत्व केलं होतं. सूर्या मुंबईला त्याच्या नेतृत्वात विजयी करण्यात अपयशी ठरला. आता मुंबई आपल्या मोहिमेतील तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध भिडणार आहे. हा सामना मंगळवारी 7 एप्रिलला होणार आहे. हार्दिक या सामन्यात खेळणार की नाही? याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

पारस म्हाम्ब्रे काय म्हणाले?

मुंबईचे बॉलिंग कोच पारस म्हाम्ब्रे यांनी हार्दिकबाबत अपडेट दिली आहे. ” हार्दिक राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध आहे. हार्दिकला दुखापत नव्हती, तो अस्वस्थ होता. आता हार्दिक बरा आहे. हार्दिकने नेट्समध्ये सरावही केला”, अशी माहिती म्हाम्ब्रे यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला दिली.

म्हाम्ब्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार हार्दिक कमबॅक करणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. त्यामुळे हार्दिकचं कमबॅक झाल्यास मुंबईचा पुन्हा कॅप्टन बदलणार हे निश्चित आहे. हार्दिक कमबॅकसह पुन्हा एकदा नेतृत्वाची सूत्र हाती घेईल.

मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?

मुंबई ताज्या आकडेवारीनुसार पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी विराजमान आहे. मुंबईने 2 पैकी 1 सामना जिंकला आहे. तर पलटणला 1 सामना गमवावा लागला आहे. मुंबईचा नेट रनरेट हा -0.206 असा आहे. त्यामुळे मुंबईचा मंगळवारी मोठ्या फरकाने सामना जिंकून नेट रनरेट सुधारण्याचा प्रयत्न असणार आहे.

हार्दिकचं कमबॅक निश्चित!

🚨 HARDIK PANDYA IS BACK 🚨

– Captain Hardik Pandya will be available for tomorrow’s match against Rajasthan Royals. 🔥 pic.twitter.com/c2jaVRXUWQ

— Johns. (@CricCrazyJohns) April 6, 2026

हार्दिक पंड्याची आयपीएल कारकीर्द

दरम्यान हार्दिक आयपीएल स्पर्धेतील आघाडीच्या ऑलराउंडर्सपैकी एक आहे. हार्दिकने कॅप्टन म्हणून 2022 साली पदार्पणातच आपल्या नेतृत्वात गुजरात टायटन्सला आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली होती. तसेच हार्दिकने या स्पर्धेत एकूण 153 सामन्यांत 2 हजार 767 धावा केल्या आहेत. तसेच हार्दिकने 79 विकेट्स मिळवल्या आहेत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आर्या आंबेकरचं मालिकाविश्वात पदार्पण; ‘या’ लोकप्रिय मालिकेत साकारली भूमिका
  • मोठं संकट! पॅसिफिक महासागरात मैला चक्रीवादळाचा कहर… भारतालाही फटका बसणार? IMD ने दिली महत्त्वाची अपडेट
  • सकाळी रिकाम्या पोटी होणाऱ्या ‘या’ चुकांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते
  • रोज 300 रुपये वाचवा, मिळवा 15 लाख, पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना
  • IPL 2026 स्पर्धेत असं घडणार! वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये ऑल टाइम रेकॉर्ड मोडणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in