• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: मला माफ करा…! आरसीबीच्या खेळाडूचा अखेर माफीनामा, खटलाही घेणार मागे

April 10, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 स्पर्धा आता पुढे सरकत असून जे खेळाडू आले त्यांच्यासोबत फ्रेंचायझी खेळत आहे. काही खेळाडू अजूनही फ्रेंचायझीसोबत जोडले गेलेले नाहीत. त्यामुळे प्लेइंग 11 निवडताना फ्रेंचायझींची दमछाक होत आहे. आरसीबीने गोलंदाजी बाजू भक्कम करण्यासाठी श्रीलंकेच्या नुवान तुषाराला संघात घेतलं आहे. पण स्पर्धा सुरू झाल्यानंतरही त्याला येता आलं नाही. कारण श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने त्याला एनओसी दिली नाही. त्यामुळे नुवान तुषाराचा संपात झाला होता. अन्याय झाल्याची भावना त्या्चया मनात रूजू झाली होती. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचा नियम त्याच्या वाटेत अडसर ठरला. फिटनेस टेस्ट पास झाल्याशिवाय कोणताही खेळाडू विदेशी लीग्स खेळणार नाही अशी अट ठेवली आहे. त्यामुळे नुवान तुषारा अडचणीत आला. त्याने या विरोधात कोर्टाचं दार ठोठावलं आणि 23 एप्रिलला या प्रकरणाची सुनावणी होणार होती. पण त्या आधीच त्याने खटला मागे घेण्याची तयारी केली आहे.

नुवान तुषाराने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाची माफी मागितली. सूत्रांच्या माहितीनुसार, तुषाराने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला मेल करत स्पष्ट केलं की, त्याचा हेतू बोर्डाला त्रास देण्याचा नव्हता. 31 वर्षीय नुवान तुषाराला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाने करारबद्ध केले आहे. पण एनओसी न मिळाल्याने नुवानने कोलंबो जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला आहे. बोर्डाला ना हरकत प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली होती.आता नुवान तुषाराच्या माफिनाम्यानंतर त्याला एनओसी मिळणार की नाही हे सांगणं कठीण आहे. सध्या श्रीलंकेकडून पाथुम निसंका आणि दासुन शनाका हे खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळथ आहेत. त्यांनी फिटनेस टेस्ट पास केली आहे. तर पथिराना आणि तुषाराला अजून फिटनेस क्लियरन्स सर्टिफिकेट मिळालेलं नाही. तर फिरकीपटू वानिंदु हसारंगा आयपीएल स्पर्धेतून आऊट झालेला आहे.

Sri Lanka fast bowler Nuwan Thushara has issued a letter of apology to Sri Lanka Cricket, expressing willingness to withdraw his legal action over the refusal to grant a No Objection Certificate (NOC) to participate in overseas franchise leagues, including the 2026 Indian Premi… pic.twitter.com/fB0IXyygvX

— Cricwire (@CricWireLK) April 10, 2026

लखनौ सुपर जायंट्सने 2 कोटींच्या मूळ किंमतीत वानिंदु हसारंगाला खरेदी केलं होतं. पण आता फिटनेसमध्ये फेल झाल्याने आयपीएलमधून आऊट झाला आहे. त्याची जागा दक्षिण अफ्रिकेचा फिरकीपटू जॉर्ज लिंडे यांनी घेतली आले. लिंडेने 250 टी20 सामन्यात 218 विकेट घेतल्या आहेत.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हुंडईचा मोठा धमाका! ग्रँड i10 निओसचे नवीन मॉडेल लाँच, किंमत किती?
  • स्कोडाची ऑफर, कार खरेदीवर तब्बल 3.5 लाखांची भरघोस सूट
  • अमरनाथ यात्रेला जात असाल तर तुमच्या बॅग पॅकिंगमध्ये या वस्तू नक्की ठेवा, वाचा यादी
  • इस्त्रायल हादरलं, युद्धविरामानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा हल्ला, थेट…, युद्ध पुन्हा पेटणार? जगभरात मोठी खळबळ
  • नव्या Flying Flea C6 इलेक्ट्रिक बाईकसाठी किती EMI बसेल? ‘हे’ गणित जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in