• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: तू कोण आहेस? युवराज सिंगच्या वडिलांनी थेट आर अश्विनला सुनावलं

March 26, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी ट्रेड विंडोच्या माध्यमातून लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सकडून अर्जुन तेंडुलकरला घेतलं. गेल्या चार वर्षांपासून अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा भाग होता. मात्र त्याला हवी तशी संधी मिळाली नाही. त्यामुळे आता लखनौ सुपर जायंट्सचा भाग असल्याने प्लेइंग 11 चा भाग असेल असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. पण माजी क्रिकेटपटू आर अश्विनने अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणं कठीण असल्याचं सांगितलं आहे. आर अश्विनच्या मते, लखनौ सुपर जायंट्स संघात एकापेक्षा एक सरस वेगवान गोलंदाज आहेत. अशा स्थितीत त्याला बेंचवर बसण्याशिवाय पर्याय नाही. लखनौ सुपरजायंट्स या पर्वात अर्जुन तेंडुलकरला एकाही सामन्यात खेळवणार नाहीत. कारण त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजांची संपूर्ण फौज आहे, असं विधान आर अश्विननं केलं. या विधानानंतर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांचा संताप झाला आहे. त्यांनी आर अश्विनचं वक्तव्य मूर्खपणाचं असल्याचं म्हंटलं आहे.

योगराज सिंग म्हणाले की, “अश्विनचं म्हणणं मूर्खपणाचं आहे. तो कोणीही असो, त्याला एखाद्याबद्दल काय बोलायचं हे कळायला हवं. तो टीव्हीवर बसून म्हणतोय, ‘तो हे करू शकत नाही, तो ते करू शकत नाही. काय करतोयस भावा?’” योगराज सिंग पुढे म्हणाले की, “जेव्हा अर्जुन इथे होता, तेव्हा मी युवीला सांगितले होते की तुम्ही लोक अर्जुन तेंडुलकरबद्दल चुकीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहात. अर्जुन अजिबात गोलंदाज नाही; त्याला पाठीच्या कण्याचा त्रास आहे, त्याचा हात 45 अंशात वाकतो. मी गोव्यातील त्याच्या प्रशिक्षकाला सांगितले होते. तुम्ही लोक काय करत आहात? हा खेळाडू षटकार आणि चौकार मारतो. जर तुम्हाला हे जमत नसेल, तर त्याला माझ्याकडे पाठवा.’”

योगराज पुढे म्हणाले, “मी तुम्हाला आव्हान देतो, जर अर्जुन तेंडुलकरने माझ्यासोबत सहा महिने घालवले, तर तो जगातील प्रत्येक फलंदाजाला हरवेल. जर तसे झाले नाही, तर मी माझी दाढी काढेन. मी माझे काम असेच करतो.” अर्जुन तेंडुलकर आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत फक्त पाच सामने खेळला आहे. त्यात त्याने 3 विकेट काढले, पण त्यासाठी बऱ्याच धावा खर्च केल्या.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटतं? कामात लक्ष लागत नाही? मग करा हा सोपा उपाय
  • Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? कर्ज वाढलंय? मग वास्तुशास्त्रामधील हा उपाय कराच
  • Chanakya Niti : तुम्हाला जर या सवयी असतील तर आयुष्यात कधी पैशांची कमी भासणार नाही, चाणक्य काय सांगतात?
  • काळी मिरीच्या ‘या’ उपायांनी तुमचं नशिब चमकणार…. एका क्लिकवर जाणून घ्या
  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in