• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: जसप्रीत बुमराह पहिल्या सामन्यात खेळणार की नाही? समोर आली अशी माहिती

March 25, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेत सहावं जेतेपद मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स संघ सज्ज आहे. यासाठी संघाची बांधणीही झाली आहे. मात्र अचानक संघातील महत्त्वाचा गोलंदाज असलेला जसप्रीत बुमराह बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये गेला. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना धक्का बसला. कारण या ठिकाणी जखमी खेळाडू जातात आणि रिकव्हर होण्यासाठी उपचार घेतात. यापूर्वी जसप्रीत बुमराह या सेंटरमध्ये काही काळ घालवला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची धाकधूक वाढली होती. त्याच्याबाबत सोशल मीडियावर अफवाही उडाल्या आहेत. असं असताना एक चांगली बातमी समोर आली आहे. जसप्रीत बुमराह पूर्णपणे फीट आहे आणि आयपीएल स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून खेळणार आहे. मग असं असताना जसप्रीत बुमराहने सीओईला भेट देण्याचं कारण काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, बुमराह आपल्या फिटनेस आणि स्ट्रेंचवर काम करण्यासाठी कोअर ऑफ ट्रेनिंगसाठी गेला आहे. बुमराहला सीओईमध्ये ट्रेनिंग देण्याचा प्लान बीसीसीआयच्या मेडिकल टीमने जुलैमध्ये भारतात होणाऱ्या इंग्लंड दौरा लक्षात ठेवून केला आहे. भारताला इंग्लंडविरुद्ध पाच टी20 आणि तीन वनडे सामने खेळायचे आहे. बुमराह सीओईमध्ये गोलंदाजी करत राहिल आणि लवकरच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात रूजू होईल. म्हणजेच जसप्रीत बुमराहाची आयपीएलसाठीची तयारीही तेथेच होत आहे असं म्हंटलं वावगं ठरणार नाही. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 29 मार्चला कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.

जसप्रीत बुमराहचा फॉर्म

जसप्रीत बुमराहने आपला फॉर्म टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत दाखवून दिला आहे. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताला जेतेपदाची चव चाखता आली. अंतिम सामन्यात त्याला प्लेयर ऑफ द मॅचा पुरस्कारही मिळाला. हा सामना भारताने 96 धावांनी जिंकला. बुमराने या सामन्यात 4 षटकं टाकली आणि 15 धावा देत 4 विकेट काढल्या. मुंबई इंडियन्सची कामगिरी गेल्या पाच वर्षात काही खास राहिली नाही. 2020 पासून मुंबई इंडियन्स जेतेपदासाठी आतुर आहे. त्यात संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा असूनही जेतेपद मिळत नसल्याने दबाव वाढला आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?
  • Bharat Gaurav Train: तुम्ही ट्रेनमध्ये करू शकता पूजा? टुरिस्ट रेल्वे इतकी खास का?
  • Chanakya Niti : ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट, जो ओळखतो तो आयुष्यात यशस्वी होतो
  • Vastu Shastra : घरात अचानक खर्च वाढलाय? पैसे पुरत नाहीयेत? मग करा हे सोपे उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in