• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: चेन्नई-दिल्ली सामन्यात काय घडलं? ऋतुराज गायकवाडला शिक्षा, तर नितीश राणाला ठोठावला दंड

April 12, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेली 18व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने विजयाची नोंद केली. चेन्नई सुपर किंग्ससाठी तीन पराभवानंतर हा पहिला विजय असल्याने खास होता. कारण या सामन्यात पराभव झाला असता तर पुढचा प्रवास आणखी कठीण झाला असता. दुसरीकड, दिल्ली कॅपिटल्सने सुरूवातीचे दोन सामने जिंकल्यानंतर सलग दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. असं असताना या सामन्यात बरंच काही घडलं. कधी हा सामना दिल्लीच्या बाजूने, तर कधी चेन्नईच्या बाजूने झुकलेला होता. पण शेवटी चेन्नई सुपर किंग्सने विजय मिळवला. पण या सामन्यातील विजयानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दोषी ठरला आहे. इतकंच काय तर सीमेबाहेर असलेल्या नितीश राणाला दंड बसला आहे. या सामन्यात नेमकं काय झालं आणि कशासाठी शिक्षा झाली ते समजून घेऊयात…

ऋतुराज गायकवाडला शिक्षा

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याला स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावला गेला. या स्पर्धेत अशी शिक्षा झालेला तिसरा कर्णधार ठरला आहे. ऋतुराज गायकवाड आयपीएल कोड ऑफ कंडक्टच्या कलम 2.22चं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. हे कलम स्लो ओव्हर रेटसाठी आहे. आयपीएल स्पर्धेत ऋतुराज गायकवाडने पहिली चूक केली आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाडला 12 लाख रुपयांचा दंड भरावा लागला आहे. यापूर्वी पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला दोन वेळा स्लो ओव्हर रेटसाठी दोषी धरलं आहे. तर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल देखील स्लो ओव्हर रेटसाठी दोषी धरला गेला आहे.

नितीश राणा दोषी

सामना सुरू असताना सीमेबाहेर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू नितीश राणाही दोषी आढळला आहे. नितीश राणाने चौथ्या पंचांसोबत वाद घातला होता. ही दृष्य कॅमेऱ्यात चित्रित झाली होती. त्यामुळे त्याला दोषी धरलं असून त्याच्या सामना मानधनातून 25 टक्के रक्कम कापली आहे. तसेच 1 डिमेरिट पॉइंट दिला गेला आहे. नितीश राणा या सामन्यात इम्पॅक्ट सब्सिट्यूट म्हणून खेळत होता.

Stubbs wanted to change his gloves, but the umpire didn’t allow it. On the very next ball, he got out. Frustrated, Nitish Rana was seen arguing with the boundary umpire, while Stubbs reacted angrily by throwing his helmet 🤯 pic.twitter.com/mQv3BlGZVM

— Middle Stump Cricket (@MiddleCricket) April 11, 2026

नितीश राणाने काय केलं?

चेन्नई दिल्ली सामन्यातील 19व्या षटकात नितीश राणा संतापलेला दिसला. दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज ट्रिस्टन स्टब्स ग्लव्ह्ज बदलू इच्छित होता. पण चौथ्या पंचांनी त्याला रोखलं. कारण रिव्ह्यू घेतला गेला होता आणि त्या दरम्यान मैदानात जाण्यास मनाई असते. इतकंच ग्लव्ह्ज बदलायचे असले तरी षटक संपल्यानंतर करावं लागतं. पण त्याच षटकात स्टब्स झेल बाद झाला. त्यामुळे नितीश राणाने चौथ्या पंचांशी वाद घातला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026, MI vs RCB : मुंबईचा आरसीबी विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय, मॅचविनर बॉलरचा पत्ता कट, Playing 11 मध्ये कोण?
  • आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्यातील एक विचित्र योगायोग; तुम्हालाही आश्चर्य वाटेल
  • आशाताईंचं 45 वर्षांपूर्वीचं अजरामर गाणं, ज्याचे बोल घेतात काळजाचा ठाव, रेखाच्या डान्समुळेही ठरलं सर्वांचं फेव्हरेट!
  • IPL 2026, LSG vs GT: गुजरातने लखनौला 7 विकेट्स राखून केलं पराभूत, गिलची सावध खेळी ठरली निर्णायक
  • भारताचे मोठे टेन्शन मिठले, कतारने हात वर करताच आणि आता येथून एलएनजीचा होणार पुरवठा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in