
शुबमन गिल याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स टीममध्ये अचानक मोठा बदल करण्यात आला आहे. गुजरात टायटन्स टीममध्ये वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी अनेक गोलंदाजांना दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे मोसमाला शेवटचे काही दिवस बाकी असताना आता या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी बदली क्रिकेटपटूंची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स टीममध्ये वेगवान गोलंदाज हर्षित राणा याच्या जागी नवदीप सैनी याला संधी देण्यात आली आहे. तर गुजरात टायटन्स टीममध्ये पृथ्वीराज यारा याच्या जागी कुलवंत खेजरोलिया याला संधी देण्यात आली आहे. कुलवंतला आयपीएल स्पर्धेत 8 सामने खेळण्याचा अनुभव आहे. गुजरात टायटन्सने कुलवंतला त्याच्या 30 लाख रुपये या बेस प्राईजमध्ये आपल्या गोटात घेतलं आहे. कुलवंतला गेल्या मोसमात गुजरात टायटन्सकडून 1 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. तसेच कुलवंतने केकेआर आणि आरसीबीचंही प्रतिनिधित्व केलं आहे.
कुलवंत खेजरोलिया याची आयपीएल कारकीर्द
कुलवंत खेजरोलिया आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत एकूण 8 सामने खेळला आहे. कुलवंतने या 8 सामन्यांमध्ये 6 विकेट्स मिळवल्या आहेत. कुलवंतने या दरम्यान 10.6 च्या इकॉनमीने धावा दिल्या आहेत. तसेच कुलवंतने देशांतर्गत क्रिकेटमध्येही आपली छाप सोडली आहे. कुलवंतने 26 टी 20 सामन्यांमध्ये 27 विकेट्स मिळवल्या आहेत. तसेच कुलवंतने 23 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 73 विकेट्स मिळवल्या आहेत. तर कुलवंतने 75 लिस्ट ए विकेट्स मिळवल्या आहेत.
19 व्या मोसमासाठी दोघांना संधी
News
Navdeep Saini replaces Harshit Rana in @KKRiders; Kulwant Khejroliya joins @gujarat_titans in place of Prithviraj Yarra.
More details
https://t.co/C9KzGiMkmL
#TATAIPL pic.twitter.com/A9lU6GbpLX
— IndianPremierLeague (@IPL) March 25, 2026
जीटीची ताकद वाढली
दरम्यान कुलवंतच्या एन्ट्रीमुळे गुजरात टायटन्सची ताकद आणखी वाढली आहे. गुजरात टीममध्ये आधीपासून मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, कगिसो रबाडा, इशांत शर्मा यासारखे अनुभवी गोलंदाज आहेत.
आयपीएल 2026 साठी गुजरात टायटन्सचा सुधारित संघ : शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, टॉम बँटन, ग्लेन फिलिप्स, साई सुदर्शन, निशांत सिंधु, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद अर्शद खान, साई किशोर, जयंत यादव, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, शाहरुख खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुथार, गुरनूर ब्रार, ईशांत शर्मा, अशोक शर्मा, कुलवंत खेजरोलिया, ल्यूक वुड आणि राशिद खान.
News
Leave a Reply