• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 : ख्रिस गेलचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम कोण मोडणार? 8 फलंदाजांच्या रडारवर रेकॉर्ड

March 22, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धा म्हंटलं की क्रीडाप्रेमींसाठी मोठी मेजवानी असते. आक्रमक फलंदाजी पाहताना चांगलंच मनोरंजन होतं. त्यात काही विक्रम रचले आणि मोडले जातात. पण आयपीएल स्पर्धेतील काही विक्रम अबाधित आहेत. असाच एक विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. ख्रिस गेलचा 59 षटकारांचा विक्रम अजूनही अबाधित आहे. चला जाणून 14 वर्षानंतर हा विक्रम कोण मोडणार ते..

यंदाच्या पर्वात अभिषेक शर्मा सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडीत काढू शकतो. मागच्या पर्वात त्याने 42 षटकार मारले होते. पण 59 षटकारांपर्यंत काही पोहोचू शकला नाही. पण यंदा हा विक्रम त्याच्या रडारवर असू शकतो. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याला लय सापडली आहे. त्यामुळे हा विक्रम मोडू शकतो.

वैभव सूर्यवंशी लहान जरी असला तरी षटकार मारण्यात तरबेज आहे. त्याने मागच्या पर्वात सात सामने खेळले होते. तसेच 27 षटकार मारले होते. त्यामुळे यंदाच्या पर्वात वैभव सूर्यवंशी षटकारांचा वर्षाव करून विक्रम मोडू शकतो.

इशान किशन सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीनंतर टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही जबरदस्त खेळी केली. आता सनरायझर्स हैदराबादचा कर्णधारपदी विराजमान झाला असून षटकारांचा विक्रम नावावर करू शकतो.

वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज निकोल पूरनही हा विक्रम मोडू शकतो. मागच्या पर्वात त्याने फ्रेंचायझीसाठी सर्वाधिक 40 षटकार मारले होते. यंदाही त्याचा आक्रमक बाणा कायम राहिला तर शर्यतीतून पुढे जाऊ शकतो.

सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरणार आहे. गेल्या वर्षभरात त्याच्या फलंदाजीची धार तशी कमी झाली आहे. मागच्या पर्वात त्याने 38 षटकार मारले होते. त्यामुळे यंदाच्या पर्वात त्याची बॅट चालली तर षटकारांचा विक्रम आपल्या नावे करण्याची दाट शक्यता आहे.

हेनरिक क्लासेनने आंतरराष्ट्रीय टी20 संघांतून निवृत्ती घेतली आहे. पण वेगवेगळ्या लीग स्पर्धेत त्याच्या फलंदाजीची जादू दिसली आहे. त्यामुळे षटकारांचा विक्रम मोडण्याची ताकद त्याच्यात आहे.

मिचेल मार्शने लखनौ सुपर जायंट्ससाठी मागच्या पर्वात 37 षटकार मारले होते. आताही त्याच ताकदीने मैदानात उतरला तर ख्रिस गेलचा विक्रम मोडू शकतो. फक्त फॉर्म कायम राहिला तर नक्कीच तो ही किमया करू शकतो.

विराट कोहलीही या यादीत येऊ शकतो. कारण त्याने मागच्या पर्वात फलंदाजीची स्टाईल थोडी बदलली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार मारत आश्चर्याचा धक्का दिला आहे. मागच्या पर्वात त्याने 38 षटकार मारले होते. त्यामुळे यंदाच्या पर्वात त्याने विक्रम मोडला तर आश्चर्य वाटायला नको.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इलेक्ट्रिक किटली मध्ये फक्त चहा आणि कॉफीच नाही तर ‘हे’ पदार्थ देखील काही मिनिटांमध्ये होतात तयार
  • Sanjay Raut : शिंदेंच्या पक्षाचीच डेडबॉडी झालीय, फडणवीसांकडून ऑपरेशन सुरू – ‘ऑपरेशन टायगर’वरून राऊतांचा घणाघात
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात मोठा कलह, थेट पत्नीनेच ट्रम्प यांच्याविरोधात धक्कादायक…
  • लग्नासाठी मुसलमान झाली… वयाच्या 23 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय… आज कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?
  • उत्तम बॅटरी पॉवर आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या वनप्लस नॉर्ड 6 ची किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in