
टीम इंडियाचा स्टार आणि युवा विकेटकीपर बॅट्समन इशान किशन याच्यासाठी गेली काही महिने अविस्मरणीय राहिले आहेत. इशानचं एकाएकी भारतीय संघात कमबॅक झालं. इशानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवलं. त्यानंतर इशानने मायदेशात टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत धमाका केला. इशानने चाबुक बॅटिंग करुन चाहत्यांची मनं जिंकली. इशानने टीम इंडियाला सलग दुसरा टी 20i वर्ल्ड कप जिंकून देण्यात प्रमुख भूमिका बजावली.
टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर सर्व खेळाडू हे आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमासाठी तयारी करत आहेत. इशान या मोसमात सनरायजर्स हैदराबादचं प्रतिनिधित्व करणार आहे. इतकंच नाही तर इशानला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र अचानक इशानची नेतृत्वाची संधी हुकणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
पॅट कमिन्स हा सनरायजर्स हैदराबादचा नियमित कर्णधार आहे. मात्र पॅटचा गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीसह संघर्ष सुरु आहे. पॅटला याच दुखापतीमुळे आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला मुकावं लागलं. त्यानंतर पॅटला याच दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावं लागल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे पॅटच्या जागी इशान किशन याच्याकडे सनरायजर्स हैदराबादच्या नेतृत्वाची धुरा देण्यात आली. तर अभिषेक शर्मा याला उपकर्णधार करण्यात आलं.
इशानला नेतृत्वाची संधी मिळणार की नाही?
इशानने आयपीएलमध्ये अद्याप नेतृत्व केलेलं नाही. मात्र त्याला आता संधी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यामागे आहे ती नियमित कर्णधार पॅट कमिन्स याची एन्ट्री. क्रिकबझच्या रिपोर्ट्सनुसार, कमिन्स 24 मार्चपर्यंत बंगलुरुत दाखल होईल. तर पॅट पहिल्या सामन्यातही खेळू शकतो, अशी शक्यता आहे. हैदराबाद या मोसमातील सलामीच्या सामन्यात गतविजेत्या आरसीबी विरुद्ध भिडणार आहे.
आता पॅट आल्यानंतर टीमसोबत जोडला जाणार का? तसेच पॅट सुरुवातीच्या काही सामन्यांत नेतृत्व करणार की खेळाडू म्हणून सहभागी होणार? असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे पॅटच्या दुखापतीबाबत काय अपडेट येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी सनरायजर्स हैदराबाद टीम : ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन, स्मरण रविचंद्रन, अभिषेक शर्मा, हर्ष दुबे, कामिंदू मेंडिस, नितीशकुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), एशान मलिंगा, जयदेव उनाडकट, हर्षल पटेल, सलील अरोरा, प्रफुल्ल हिंगे, लियाम लिव्हिंगस्टोन, शिवम मावी, जॅक एडवर्ड्स, ब्रायडन कार्स, साकिब हुसेन, झीशान अन्सारी, अनिकेत वर्मा, अमित कुमार आणि क्रेन्स फुलेत्रा.
Leave a Reply