• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी रवींद्र जडेजाचं वादळ घोंघावलं, 250 च्या स्ट्राईक रेटने ठोकल्या धावा

March 28, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेला आता काही तासात सुरूवात होईल. या स्पर्धेत सर्वच दहा फ्रेंचायझींनी आपल्या संघाची बांधणी केली आहे. पण या स्पर्धेपूर्वी झालेल्या एका ट्रेड डीलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात ही डील झाली होती. संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा यांच्यात अदलाबदल झाली होती. राजस्थान रॉयल्सने पुन्हा एकदा रवींद्र जडेजाला आपल्या संघात घेतलं आहे. रवींद्र जडेजा हा आयपीएल 2008 विजेत्या संघाचा भाग होता. त्यामुळे त्याच्याकडून पुन्हा एकदा तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. रवींद्र जडेजाचा अनुभवही दांडगा आहे. त्यामुळे त्याचा फायदा राजस्थान रॉयल्स असं वाटत आहे. त्याची एक झलक रवींद्र जडेजाने सराव सामन्यात दाखवून दिली आहे. त्याची फलंदाजी पाहून राजस्थान रॉयल्स आणि त्याचे चाहते खूश झाले आहेत.

राजस्थान रॉयल्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने सराव सामन्यात जुरेल 11 विरुद्ध जबरदस्त फलंदाजी केली. त्याने 34 चेंडूत नाबाद 95 धावा ठोकल्या. यावेळी रवींद्र जडेजाने सर्वच गोलंदाजांची पिसं काढली. चौकार षटकारांचा वर्षाव केला. इतकंच काय तर फलंदाजीसोबत गोलंदाजीतही तितकी ताकद दाखवून दिली. त्याने या सामन्यात 4 विकेट काढल्या. रवींद्र जडेजाची ही खेळी पाहून त्याचा फॉर्म काय आहे याचा अंदाज क्रीडाप्रेमींनी बांधला आहे.

🚨Sir Ravindra jadeja has scored 95* runs in just 34 balls against Jurel 11 in the practice match ,and took 4 wickets . pic.twitter.com/cfGCgJ69RR

— ` (@Leftarmoffspinn) March 27, 2026

आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे. मागच्या पर्वात याच संघातून रवींद्र जडेजा खेळला आहे. गेली अनेक वर्षे तो चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. जेतेपद मिळवून देण्यात त्याने मोलाचा हातभारही लावला आहे. त्यामुळे रवींद्र जडेजाचा हा फॉर्म पाहून धडकी भरणार हे नक्की आहे. 30 मार्चला राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स भिडणार आहेत. रवींद्र जडेजाने आतापर्यंत आयपीएल करिअरमध्ये 3260 धावा आणि 170 विकेट काढल्या आहेत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे
  • मंगळ ग्रहाचे संक्रमण ‘या’ 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार, जाणून घ्या
  • विकट संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करा ‘या’ गोष्टी, प्रत्येक अडथळा होईल दूर
  • Vastu Shastra: नोकरीमध्ये स्थिरता नाहीये? तुम्ही सतत नोकरी बदलत आहात? मग करा हा सोपा उपाय
  • अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘या’ वस्तू खरेदी करू नका, नाहीतर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in