• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स या प्लेइंग 11 सह उतरणार! आकाश चोप्राने असं मांडलं गणित

March 13, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या जेतेपदासाठी सर्व संघांनी कंबर कसली आहे. यात मुंबई इंडियन्स संघही मागे नाही. मुंबई इंडियन्स संघ कागदावर एकदम स्ट्राँग आहे. त्यामुळे खेळाडूंची नावं ऐकली तर प्रतिस्पर्धी संघांना घाम फुटेल. पण मुंबई इंडियन्सने शेवटची आयपीएल ट्रॉफी 2020 मध्ये जिंकली होती. त्यानंतर सलग पाच वर्षे पदरी निराशा पडली आहे. आता मुंबई इंडियन्स संघ पुन्हा एकदा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात जेतेपदासाठी सज्ज झाला आहे. असं असताना मिनी लिलावानंतर मुंबई इंडियन्स संघ खूपच मजबूत दिसत आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या मते हा संघ सर्वात घातक दिसत आहे. कारण मुंबई इंडियन्सच्या बहुतांश खेळाडूंनी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांचा फॉर्म काय आहे याचा अंदाज येतो.

हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा हे या संघात आहेत. त्यात रोहित शर्मा सलामीला उतरून चांगली सुरूवात देण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने गेल्या काही महिन्यात आपल्या फिटनेस आणि फलंदाजीवर काम केलं आहे. तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केलेला क्विंटन डीकॉक आणि रयान रिकल्टनही हे देखील संघात आहेत. इतकंच काय तर संघात शेरफेन रूदरफोर्ड, कॉर्बिन बॉश आणि विल जॅक्स हे खेळाडू देखील आहेत. या खेळाडूंनी आपआपल्या संघांसाठी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघ यावेळी इतर संघांपेक्षा मजबूत दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aakash Chopra (@cricketaakash)

मुंबई इंडियन्स संघात आयपीएलमध्ये आपली ताकद दाखवलेले ट्रेंट बोल्ट, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर यासारके खेळाडू देखील आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सची प्लेइंग 11 पाहिली तर सर्वच धुरंधर असल्याचं दिसून येत आहेत.

अशी असू शकते प्लेइंग 11

रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक/रयान रिकल्टन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शेरफेन रदरफोर्ड, विल जॅक्स/नमन धीर/ कॉर्बिन बॉश, मयंक मार्कंडेय/मिचेल सँटनर/अल्लाह गजनफर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह. इम्पॅक्ट प्लेयर- शार्दुल ठाकुर

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Egg Production India : भारतातील कोणतं राज्य अंडी उत्पादनात नंबर 1? जगात अंड्यांच्या उत्पादनात भारत कितव्या स्थानावर?
  • Supriya Sule On Baramati Election | रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
  • IPL 2026: महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? आता नवीन तारीख आली समोर
  • मुंबईकरांनो घरातून बाहेर पडण्याआधी सावधान, मध्य रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक
  • 747 कोटींचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप पण OTT वर सुपरहिट, नंबर 1, काय आहे स्टोरी?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in