
आयपीएल 2026 स्पर्धेतील 14 सामन्यांचा खेळ संपला असून काही संघांना अजूनही स्टार खेळाडूंची प्रतीक्षा आहे. कोट्यवधि रूपये मोजून देखील त्यांचं योगदान मिळत नाही. त्यामुळे काही संघांची स्थिती नाजूक आहे. चला जाणून घेऊयात या खेळाडूंबाबत सविस्तर
चेन्नई सुपर किंग्स सलग तीन पराभवामुळे गुणतालिकेत तळाशी आहे. खरं तर या संघात नेतृत्वाचा अभाव दिसून आला आहे. त्यामुळे महेंद्रसिंह धोनीचं मार्गदर्शन अपेक्षित आहे. पण पोटरीच्या दुखापतीतून सावरला नसून 11 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळणार नाही. 14 एप्रिलला केकेआरविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे.
चेन्नई सुपर किंग्स आक्रमक फलंदाज डेवॉल्ड ब्रेव्हिस याची वाट पाहात आहे. आनंदाची बातमी म्हणजे दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सने याबाबतची माहिती देताना स्पष्ट केलं की, 11 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी उपलब्ध असेल.
दिल्ली कॅपिटल्सची स्पर्धेतील स्थिती चांगली आहे. पण स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कची उणीव भासत आहे. चार षटकं व्यवस्थित टाकू शकेल असा गोलंदाज दिल्ली कॅपिटल्सला हवा आहे. मिचेल स्टार्कवर ऑस्ट्रेलियात उपचार सुरू असून 21 एप्रिलला संघात सहभागी होण्याची शक्यता आहे.
वानिंदू हसारंगा आयपीएल स्पर्धेला मुकला आहे. त्यामुळे त्याची जागा भरून काढण्याचं मोठं आव्हान लखनौ सुपर जायंट्सपुढे होते. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे हसारंगा त्रस्त आहे. त्याची जागा आता जागा दक्षिण अफ्रिकेचा फिरकीपटू जॉर्ज लिंडे यांनी घेतली आहे.
कोलकाता नाइट रायडर्सचा वेगवान गोलंदाज पाथिराना फिटनेस टेस्ट देणार आहे. कारण श्रीलंकन क्रिकेट बोर्डाकडून एनओसी मिळाल्याशिवाय खेळू शकत नाही. सर्व काही नियोजनानुसार झाल्यास 16 एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्यात खेळेल. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नडवरून)





Leave a Reply