• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 : आयपीएल आजपासून सुरु होत असताना एमएस धोनीबद्दल आली वाईट बातमी

March 28, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 ला आजपासून सुरुवात होत आहे. हा 19 वा सीजन आहे. टुर्नामेंट आजपासून सुरु होत असताना फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. खरंतर असं काही घडेल याची कोणालाच अपेक्षा नव्हती. महेंद्र सिंह धोनी हा दरवर्षी होणाऱ्या आयपीएल टुर्नामेंटचं मुख्य आकर्षण असतो. तो चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार आहे. एमएस धोनी आयपीएलमधील सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाहीय. धोनीला दुखापत झालीय. त्यामुळे आयपीएल 2026 मध्ये सुरुवातीचे दोन आठवडे तो खेळू शकणार नाहीय. त्यामुळे CSK ला धोनी शिवायचं मैदानावर उतरावं लागेल. सीएसके आणि एमएस धोनी हे आयपीएलच्या स्टार्ट पासून बनलेलं समीकरण आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून आज 28 मार्चला सकाळी अधिकृत स्टेटमेंट देण्यात आलं. त्यात धोनीच्या दुखापतीची माहिती देण्यात आली आहे.

“एमएस धोनी स्ट्रेनच्या समस्येचा सामना करतोय. तो रिहॅबिलटेशन प्रक्रियेमध्ये आहे. त्यामुळे आयपीएल 2026 मध्ये सुरुवातीचे दोन आठवडे त्याला बाहेर रहावं लागेल” असं csk कडून सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. धोनीची दुखापत ही CSK आणि त्यांच्या फॅन्ससाठी मोठा झटका आहे. कारण धोनी फक्त एक सामना नाही, तर पुढचे दोन आठवडे CSK साठी मैदानावर उतरु शकणार नाहीय.

धोनी कधी परतणार?

धोनी 2 आठवडे 14 दिवस बाहेर राहणार असेल तर तो कमीत कमी 3 सामने खेळू शकणार नाही. सीएसकेचा पहिला सामना 30 मार्चला गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध आहे. त्यानंतर पुढचा सामना 3 एप्रिलला चेन्नईत पंजाब किंग्स विरुद्ध होईल. टीम आपला पाचवा सामना गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध 5 एप्रिलला आपल्या घरच्या मैदानावर खेळेल. धोनी 11 एप्रिलला होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात खेळू शकतो.

सर्जरी सुद्धा झाली होती

धोनी मागच्या दोन सीजनपासून फिटनेस समस्येचा सामना करत आहे. गुडघे दुखापतीचा सामना त्याला करावा लागला आहे. अनेकदा तो गुडघ्याला आईसपॅक बांधून खेळताना दिसतो. 2024 च्या सीजननंतर त्याच्या गुडघ्यावर सर्जरी सुद्धा झाली होती. वयोमानानुसार, त्याच्या टीममधील स्थानावर सुद्धा अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. धोनीने स्वत:बद्दलच फिट ठेवणं एक चॅलेंज असल्याचं म्हटलं होतं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच
  • Chanakya Niti : घरातील कुटुंबप्रमुखासाठी चाणक्य यांचा खास सल्ला, या 5 गोष्टी नसतील तर अख्खं घर बरबाद होईल
  • घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे
  • मंगळ ग्रहाचे संक्रमण ‘या’ 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार, जाणून घ्या
  • विकट संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करा ‘या’ गोष्टी, प्रत्येक अडथळा होईल दूर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in