• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: अर्जुन तेंडुलकर किती किलोची बॅट घेऊन खेळतो? ऋषभ पंतने विचारलं आणि मिळालं असं उत्तर

March 19, 2026 by admin Leave a Comment

IPL 2026, Arjun Tendulkar Rishab Pant: आयपीएल स्पर्धेपूर्वी झालेल्या मिनी लिलावानंतर संघांची पुर्नबांधणी झाली आहे. मागच्या पर्वात काही उणीवा या खेळाडूंच्या माध्यमातून भरून काढण्याचा प्रयत्न असणार आहे. लखनौ सुपर जायंट्सने मिनी लिलावापूर्वी ट्रेड विंडोचं कार्ड वापरलं आणि अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरला संघात घेतलं. यापूर्वी अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात होता. मात्र त्याला हवी तशी संधी मिळाली नाही. त्यामुळे अनेकदा बेंचवरच बसून असायचा. पण यावेळी त्याच्यावर लखनौ सुपर जायंट्सने डाव लावला आहे. तसेच ऋषभ पंतच्या नेतृत्वात मैदानात उतरण्याची शक्यता वाढली आहे. या स्पर्धेसाठी अर्जुन तेंडुलकरने खास ट्रेनिंग घेतली. अर्जुन तेंडुलकरने यॉर्करला धार दिली, दुसरीकडे, ऋषभ पंतने बॅट स्विंगसाठी युवराज सिंगकडून धडे गिरवले. असं असताना ऋषभ पंत आणि अर्जुन तेंडुलकर यांचा एक व्हिडीओ लखनौ सुपर जायंट्सने पोस्ट केला आहे. या व्हिडीओतील चर्चा वेगळीच आहे. या व्हिडीओच्या शेवटी पंत आणि अर्जुन तेंडुलकर चर्चा करत आहेत. तेव्हा अर्जुन तेंडुलकर बॅटच्या वजनाबाबत सांगितलं.

आयपीएल स्पर्धेसाठी सुरू असलेल्या सराव शिबिरात ऋषभ पंतने अर्जुन तेंडुलकरला विचारलं की, ‘तुझ्या बॅटचं वजन किती आहे?’ त्यावर अर्जुनने उत्तर देत सांगितलं की, 1200 ग्रॅम.. यावर पंतला आश्चर्याचा धक्का बसला. त्याने पुन्हा विचारलं की, इतक्या वजन बॅटचा काय उपयोग आहे का? त्यावर अर्जुनने उत्तर दिलं की, चेंडूला नुसतं टच केलं की होऊन जातं. इतकंच काय तर अर्जुनने वडील सचिन तेंडुलकरच्या बॅटचं वजन 1310-1315 होतं असं सांगितलं. इतकंच काय तर अर्जुनने पुढे सांगितलं की, 1200 ग्रॅम पेक्षा कमी वजनाची बॅट वापरतच नाही. अर्जुन तेंडुलकर आतापर्यंत मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला आहे. चार वर्षांपासून तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. त्याने 2023 मध्ये डेब्यू केलं. त्याने चार सामन्यात तीन विकेट घेतल्या.

Already loving this new Rishabh-Arjun bond 🥹❤💙 pic.twitter.com/pa79YqebbU

— Lucknow Super Giants (@LucknowIPL) March 18, 2026

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत अर्जुन तेंडुलकरसोबत चर्चा केल्यानंतर खूपच प्रभावित झाला. पंतने त्याला सांगितलं की, ‘तू युवराज सिंह सोबत सराव करत होता पूर्ण दिवस?’ अर्जून तेंडुलकरचं 5 मार्चला विवाह झाला आहे. सानिया चांडोकसोबत विवाह झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अर्जुन तेंडुलकर डीवाय पाटील टी20 स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्याचं क्रिकेटप्रती प्रेम पाहून ऋषभ पंतने त्याचं कौतुक केलं.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इस्लामाबादच्या बैठकीआधीच भारताचा मोठा गेम, रातोरात भारताची अमेरिकेसोबत… काय घडलं दोन देशात?
  • Mukul Choudhary : थोडक्यात मुंबई इंडियन्सच्या हातून जो मोहरा निसटला तो आज LSG साठी ठरला हिरो, कोण आहे मुकुल चौधरी?
  • ज्या हॉटेलमध्ये वडील वेटर होते, तेच हॉटेल या अभिनेत्याने विकत घेतलं, वडिलांना दिलं खास गिफ्ट
  • तुम्ही दररोज नकळत खाताय प्लास्टिक? आजच बदला या गोष्टी, चौथ्या गोष्टीचा तर दर तासाला होतो वापर!
  • संधी मिळताच पाकिस्तानने दाखवले दात… नोबेल पुरस्काराच्या मागणीच्या यादीतून ट्रम्प गायब; कोणत्या तीन लोकांसाही हवाय पुरस्कार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in