• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 : अजिंक्य रहाणेची 19 व्या मोसमाआधी चाबूक बॅटिंग, केकेआरच्या कॅप्टनचा धमाका

March 23, 2026 by admin Leave a Comment

एकूण 3 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी 19 व्या मोसमात अजिंक्य रहाणे याच्याकडे आहे. केकेआर सध्या जोरदार सराव करत आहे. रहाणेला नेतृत्वाचा तगडा अनुभव आहे. मात्र रहाणेवर वेगवान बॅटिंगबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. रहाणेने त्याच्या या क्षमतेवर शंका घेणाऱ्यांना बॅटिंगनेच उत्तर दिलं आहे. रहाणेने सराव सामन्यादरम्यान चौकार षटकार ठोकून आपण मुख्य स्पर्धेसाठी सज्ज असल्याचं जाहीर केलं आहे.

कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात इंट्रा स्क्वाड सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पर्पल नाईट्सने 249 धावा केल्या. पर्पल नाईट्सला इथवर पोहचवण्यात रहाणेने प्रमुख भूमिका बजावली. रहाणेने फक्त 25 बॉलमध्ये 58 धावांची खेळी केली. रहाणेने या दरम्यान फिन एलन याच्यासह ओपनिंग केली.

रहाणे आणि एलन या दोघांनी पहिल्याच बॉलपासून फटकेबाजीला सुरुवात केली. फिन एलन याने 16 बॉलमध्ये 31 धावा केल्या. कॅमरुन ग्रीन याने 52 धावांची खेळी केली. तर रमनदीप सिंग याने 16 चेंडूत 42 धावांचं योगदान दिलं.

अजिंक्य रहाणे याने टी 20 क्रिकेटमध्ये ओपनिंगला आल्यानंतर चांगली कामगिरी केल्याचं आकड्यातून स्पष्ट होतं. अजिंक्यने टी 20 कारकीर्दीतील बुहतांश धावा या ओपनर म्हणूनच केल्या आहे. तसेच रहाणे पावरप्लेमध्ये बॅटिंग करण्यात माहिर आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
  • सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?
  • Bharat Gaurav Train: तुम्ही ट्रेनमध्ये करू शकता पूजा? टुरिस्ट रेल्वे इतकी खास का?
  • Chanakya Niti : ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट, जो ओळखतो तो आयुष्यात यशस्वी होतो

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in