• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL : स्पर्धेच्या इतिहासात या फ्रेंचायझीने बदलले सर्वाधिक कर्णधार, 17 जणांच्या खांद्यावर टाकली धुरा

March 18, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल स्पर्धा अवघ्या काही दिवसांनी सुरू होणार आहे. या स्पर्धेपूर्वी कर्णधार बदलाचे वारे वाहू लागले आहेत. काही संघांनी पर्याय नसल्याने कर्णधार बदलला आहे. आयपीएस स्पर्धेच्या इतिहासात एक संघाने 17 वेळा कर्णधार बदलला आहे. म्हणजेच 18 पर्वात 17 कर्णधार असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादला कर्णधार बदलाचा निर्णय घेणं भाग पडलं. कारण पॅट कमिन्स दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे सुरूवातीच्या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी सुरूवातीच्या सामन्यात इशान किशनला कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदाबाबतही चर्चा सुरू आहे. मात्र कर्णधार बदलणार की नाही हे मात्र गुलदस्त्यात आहे. सध्या तरी अजिंक्य रहाणेच कर्णधार आहे. मागच्या पर्वात सुमार कामगिरी झाल्याने कर्णधार बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण तसं तरी अद्याप दिसत नाही. दुसरीकडे, इशान किशन हा सनरायझर्स हैदराबादचा 11वा कर्णधार आहे. पण या यादीत 17 कर्णधार देणारा संघ अव्वल स्थानी आहे. चला जाणून घेऊयात हा संघ कोणता आहे आणि कोणते कर्णधार दिले ते…

पंजाब किंग्स कर्णधार बदलण्यात आघाडीवर

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक कर्णधार देणारी फ्रेंचायझी म्हणून पंजाब किंग्स आघाडीवर आहे. आतापर्यंत 18 पर्वात 17 जणांवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. युवराज सिंग, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, एडम गिलख्रिस्ट, डेविड हसी, जॉर्ज बेली, वीरेंद्र सेहवाग, डेविड मिलर, मुरली विजय, ग्लेन मॅक्सवेल, आर अश्विन, केएल राहुल, मयंक अग्रवाल, शिखर धवन, सॅम करन, जितेश शर्मा आणि आता श्रेयस अय्यर या भूमिकेत आहे.

दिल्ली कॅपिटल्स या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. या संघाने 14 कर्णधार आतापर्यंत केले आहेत. सध्या कर्णधारपदाची धुरा अक्षर पटेलकडे आहे. यापूर्वी वीरेंद्र सेहवाग, गौतम गभीर, दिनेश कार्तिक, जेम्स होप्स, जयवर्धने, डेविड वॉर्नर, केविन पीटरसन, जेपी डुमिनी, जहीर खान, करुण नायर, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, डुप्लेसी यांनी जबाबदारी पार पाडली आहे.

सनरायझर्स हैदराबादने 11 वा कर्णधार म्हणून इशान किशनची नियुक्ती केली आहे. यापूर्वी कुमार संगकारा, कॅमरन व्हाइट, शिखर धवन, डॅरेन सॅमी, डेविड वॉर्नर, केन विलियमसन, भुवनेश्वर कुमार, मनीष पांडे, मार्करम, पॅट कमिंस यांनी कर्णधापद भूषवलं आहे.

मुंबई इंडियन्स आणि आरसीबी या यादीत संयुक्तपण चौथ्या स्थानावर आहेत. आतापर्यंत दोन्ही संघांनी 9 कर्णधार दिले आहेत. मुंबई इंडियन्सने सचिन तेंडुलकर, हरभजन सिंह, शॉन पॉलक, ड्वेन ब्रावो, रिकी पॉन्टिंग, रोहित शर्मा, काइरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. तर आरसीबीने राहुल द्रविड़, केविन पीटरसन, अनिल कुंबले, डॅनियल विटोरी, विराट कोहली, शेन वॉटसन, डुप्लेसी, रजत पाटीदार आणि जितेश शर्माला कर्णधार केलं आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने सौरभ गांगुली, मॅक्कलम, गौतम गंभीर, दिनेश कार्तिक, ऑयन मॉर्गन, श्रेयस अय्यर, नीतीश राणा, अजिंक्य रहाणे यासह 8 कर्णधार दिले. तर राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्न, शेन वॉटसन, द्रविड़, स्टीव स्मिथ, अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन आणि रियान परागसह 7 कर्णधार दिले.

चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्सने प्रत्येकी चार कर्णधार दिले. चेन्नई सुपर किंग्स पहिल्या पर्वापासून खेळत आहे आणि फक्त चार कर्णधार दिले. यात महेंद्रसिंह धोनी सर्वाधिक काळ कर्णधारपद भूषवलं. चेन्नई सुपर किंग्ससाठी महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड यांनी कर्णधारपद भूषवलं. तर लखनौने केएल राहुल, कृणाल पांड्या, निकोलस पूरन आणि ऋषभ पंत यांना जबाबदारी दिली आहे. गुजरात टायटन्सचं नेतृत्व हार्दिक पांड्या, राशिद खान आणि शुबमन गिलने केलं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in