• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL : आयपीएल स्पर्धेत सर्वात संथ शतक झळकावणारे 5 फलंदाज, विराटचा पहिला नंबर

March 17, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेट चाहत्यांना कायमच आयपीएल स्पर्धेची प्रतिक्षा असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू हा देशासाठी खेळत असतो. मात्र आयपीएलमध्ये सर्व देशातील खेळाडू वेगवेगळ्या संघांकडून  खेळतात. त्यामुळे आयपीएल स्पर्धेनिमित्ताने खेळाडूंना एक वेगळच चित्र पाहायला मिळतं. या स्पर्धेत धावांचा पाऊस पाहायला मिळतो. आयपीएल म्हटलं की गोलंदाजांची धुलाई हे समीकरण ठरलेलंच आहे. फलंदाज अक्षरक्ष: गोलंदाजांची धुलाई करतात. त्यामुळे बॅटिंगने अनेक विक्रम होत असतात. टी 20 क्रिकेटमध्ये 120 चेंडूंचा खेळ होता. त्यातही शतक करणं म्हणजे मोठी बाब आहे. ख्रिस गेल, रोहित शर्मा विराट कोहली आणि यासारख्या फलंदाजांना फटकेबाजी करताना आपण पाहिलंय. या तिघांनी शतकही झळकावलंय. मात्र या स्पर्धेत सर्वात संथ शतक लगावणाऱ्या 5 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

5 फलंदाज आणि संथ शतक

आयपीएल स्पर्धेत सर्वात संथ शतक लगावण्याचा विक्रम हा संयुक्तरित्या मनीष पांडे आणि विराट कोहली या दोघांच्या नावावर आहे. विराटने 2024 साली 67 चेंडूत शतक झळकावलं होतं. विराटने राजस्थान रॉयल्स विरुद्ध शतक केलं होतं. तर मनीष पांडे याने 2009 मध्ये डेक्कन चार्जर्स विरुद्ध शतक ठोकलं होतं. दोन्ही फलंदाज त्यांच्या स्फोटक बॅटिंगसाठी ओळखले जातात. मात्र त्यांच्या नावावर हा नकोसा विक्रम आहे.

दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याने 2011 साली कोच्ची टस्कर्स केरळ विरुद्ध शतक केलं होतं. सचिनने 66 चेंडू अर्थात 11 षटकांचा सामना करुन शतक पूर्ण केलं. तर केएल राहुल याने 2016 मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध खेळताना 64 बॉलमध्ये शेकडा पूर्ण केला होता.
अंबाती रायुडू याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 62 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं होतं.

आयपीएलमधील सर्वात संथ शतक

विराट कोहली , IPL 2024,67 बॉल

मनीष पांडे , IPL 2009, 67 बॉल

सचिन तेंडुलकर, IPL 2011, 66 बॉल

केएल राहुल, IPL 2019, 64 बॉल

अंबाती रायुडू, IPL 2018, 62 बॉल

वेगवान शतकाचा विक्रम कुणाच्या नावावर?

दरम्यान आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक हे अवघ्या 30 चेंडूत पूर्ण करण्यात आलं होतं. युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल याने ही कामगिरी केली होती. तेव्हापासून हा विक्रम कायम आहे. त्यामुळे यंदा 19 व्या मोसमात विराट आणि इतर फलंदाजांपैकी कोणते फलंदाज गेलचा विक्रम मोडीत काढण्यात यशस्वी ठरतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इस्लामाबादच्या बैठकीआधीच भारताचा मोठा गेम, रातोरात भारताची अमेरिकेसोबत… काय घडलं दोन देशात?
  • Mukul Choudhary : थोडक्यात मुंबई इंडियन्सच्या हातून जो मोहरा निसटला तो आज LSG साठी ठरला हिरो, कोण आहे मुकुल चौधरी?
  • ज्या हॉटेलमध्ये वडील वेटर होते, तेच हॉटेल या अभिनेत्याने विकत घेतलं, वडिलांना दिलं खास गिफ्ट
  • तुम्ही दररोज नकळत खाताय प्लास्टिक? आजच बदला या गोष्टी, चौथ्या गोष्टीचा तर दर तासाला होतो वापर!
  • संधी मिळताच पाकिस्तानने दाखवले दात… नोबेल पुरस्काराच्या मागणीच्या यादीतून ट्रम्प गायब; कोणत्या तीन लोकांसाही हवाय पुरस्कार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in