• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL : आयपीएलमधील 6 सर्वात मोठे विक्रम, 1 रेकॉर्ड ब्रेक करणं अशक्य, विराटने काय केलंय?

March 22, 2026 by admin Leave a Comment


आयपीएलच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत असंख्य विक्रम झाले आहेत. मात्र या स्पर्धेच्या इतिहासातील 5 विक्रम आहेत जे मोडीत निघणं अवघड आहेत. तर यापैकी 1 असा विक्रम आहे जो मोडीत निघणं अशक्यच आहे. (Photo Credit: PTI)

IPL Rcb Virat Kohli

विराट कोहली याच्या नावावर आयपीएल स्पर्धेच्या एका मोसमात सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. विराटने 2016 साली 973 धावा केल्या होत्या. विराटचा हा विक्रम अजूनही कायम आहे. (Photo Credit: PTI)

Vaibhav Sooryavanshi Century

वैभव सूर्यवंशी याच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शतक लगावण्याचा विक्रम आहे. वैभवने वयाच्या 14 व्या वर्षी ही किमया केली होती. त्यामुळे वैभवचा हा विक्रम येत्या काही वर्षात तरी ब्रेक होईल याची काडीमात्र शक्यता नाही. (Photo Credit: PTI)

IPL Chris Gayle

माजी फलंदाज ख्रिस गेल याच्या नावावर स्पर्धेच्या इतिहासातील एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. गेलने एका डावात 175 धावा केल्या होत्या. एका संघाला काही सामन्यांमध्ये 175 धावांपर्यंत पोहचता येत नाही. त्यामुळे एका फलंदाजाला 175 धावांची खेळी करणं अवघडच नाही तर अशक्यच आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. (Photo Credit: PTI)

Punjab Kings Highest Totals Chase In Ipl

या स्पर्धेत सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा अर्थात चेस करण्याचा विक्रम हा पंजाब किंग्सच्या नावावर आहे. पंजाबने केकेआर विरुद्ध 2024 साली 262 धावांचा यशस्वी पाठलाग करुन ऐतिहासिक विजय साकारला होता. (Photo Credit: PTI)

Rcb Lowest Total In Ipl

स्पर्धेतील सर्वात निच्चांकी धावसंख्येचा विक्रम आरसीबीच्या नावावर आहे. केकेआरने आरसीबीला 49 धावांवर गुंडाळलं होतं. हल्ली एकटाच फलंदाज साऱ्या सामन्याचा निकाल ठरण्याची क्षमता ठेवतो. मात्र एखाद दिवस वाईट असेल तर निच्चांकी धावसंख्येचा नकोसा विक्रमही मोडीत निघू शकतो. (Photo Credit: PTI)

Csk Ravindra Jadeja

तसेच स्पर्धेच्या इतिहासात एका ओव्हरमध्ये सर्वाधिक 37 धावा करण्याचा विक्रम आहे. हा विक्रम कोणताही फलंदाज आपल्या जोरावर मोडीत काढू शकत नाही. एक फलंदाज फार फार 6 षटकार ठोकून 36 धावा करु सकतो. त्यामुळे फलंदाज म्हणून हा विक्रम मोडीत निघणं अशक्य आहे. (Photo Credit: PTI)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भोंदू खरातची आता खैर नाही, 160 GB डेटा, कोडवर्ड लागले हाती; प्रत्येक फोल्डरमध्ये…
  • युद्धात रशियाची अत्यंत मोठी घोषणा, पुढील 32 तासात कोणत्याही प्रकारचा..
  • Gold Purchase : भारतावर सोन खरेदीत या दोन देशांची मात, तेच रशियावर आली सोनं विकण्याची वेळ
  • युद्ध संपताच इराणची मोठी खेळी, पाकिस्तान पाहतच राहिला, चीनला जबर शॉक, भारताला थेट…
  • LPG booking rules: एलपीजी सिलिंडर बुकिंगमध्ये मोठा बदल; सरकारकडून ग्राहकांना इशारा, eKYC अनिवार्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in