• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

India vs USA Head to Head Records : पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडिया करणार वर्ल्ड रेकॉर्ड ? अमेरिकेविरोधात कशी आहे कामगिरी..

February 7, 2026 by admin Leave a Comment

India vs USA Head to Head Records, T20 World Cup 2026 News in Marathi : संपूर्ण जगातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून असलेल्या टी20 वर्ल्डकप 2026ला आजपासून सुरूवात होत आहे. गतविजेत्या भारतीय संघाचा आज (7 फेब्रुवारी) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध पहिला सामना आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. 2 वर्षांपूर्वी म्हणजेच 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर यावर्षीही तीच विजयी पताका फडकावून या स्पर्धेची दमदार सुरूवात करण्याचा भारतीय संघाचा इरादा आहे.

भारत-अमेरिका संघात हेड टू हेड रिकॉर्ड

भारत आणि अमेरिका यांच्यात आतापर्यंत फक्त एकच टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला आहे, जो 2024 च्या टी-२० वर्ल्डकपदरम्यान न्यूयॉर्कमध्ये झाला होता. भारताने तो सामना आरामात जिंकला. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेला 20 षटकांत फक्त 110 धावा करता आल्या. त्यानंतर भारताने 18.2 षटकांत 3 गडी गमावून हे लक्ष्य गाठलं. त्यामुळे आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाचाच वरचष्मा दिसत आहे.

वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची भारताकडे संधी

टी20 वर्ल्ड कप 2026च्या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाला एक मोठा विश्वविक्रम करण्याची संधी मिळेल. खरं तर, भारतीय संघाने मागील आवृत्तीत सलग आठ सामने जिंकले होते. त्यामुळे आज सुरू होणाऱ्या स्पर्धेतील या सामन्यात भारतीय संघ जिंकल्यास तो त्यांचा सलग 9वा विजय असेल. यासह, भारत टी-20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सलग विजय मिळवणारा संघ बनेल. सध्या, भारतीय संघ हा दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासह पहिल्या स्थानावर आहे, त्या संघांनीही प्रत्येकी सलग आठ विजय मिळवले आहेत.

दोन्ही संघांची टीम

भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सैमसन, शिवम दुबे, ईशान किशन, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंह, रिंकू सिंह, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल (उपकर्णधार ) आणि वॉशिंगटन सुंदर.

USA चा संघ : मोनांक पटेल (कर्णधार), जेसी सिंह, एंड्रीज गौस, शेहान जयसूर्या, मिलिंद कुमार, शायन जहांगीर, सैतेजा मुक्कमाला, संजय कृष्णमूर्ति, हरमीत सिंह, नोस्टुश केनजिगे, शैडली वान शल्कविक, सौरभ नेत्रवालकर, अली खान, मोहम्मद मोहसिन, शुभम रंजाने.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराण संघर्षात सौदीने वाढवले गॅसचे दर, भारत आणि चीन यांनी बदलली रणनिती
  • इराणने जिरवली! जखमी अमेरिकन सैनिकांनी सांगितलं असं सत्य की… डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा
  • मद्यपानापूर्वी दारूचे दोन थेंब जमिनीवर का शिंपडतात? अट्टल बेवड्यालाही माहिती नसेल खरं कारण
  • 6 मिनिट 9 सेकंदाचं गाणं, ज्याने लोकांना आणलं होतं अडचणीत, देशभरात अनेकांना झाली होती अटक
  • …म्हणून केकेआरचा पराभव! कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटच्या षटकात काय घडलं ते सांगितलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in