• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

India vs Pakistan: तरच टीम इंडिया विरुद्ध खेळणार! पाकिस्तानची अट काय? जाणून घ्या

February 2, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तानचा क्रिकेट संघ आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार नसल्याचं सरकारने जाहीर केलं. पाकिस्तान सरकारने 1 फेब्रुवारीला टीम इंडिया विरुद्ध 15 फेब्रुवारीला नियोजित सामन्यावर बहिष्कार घातल्याचं जाहीर केलं. मात्र पाकिस्तानकडन या सामन्यावर बहिष्कार घालण्याचं कारण स्पष्ट करण्यात आलं नाही. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना हायव्होल्टेज सामन्याला मुकावं लागणार आहे. तसेच हा सामना होणार नसल्याने आयसीसी आणि पीसीबीला आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे.

क्रिकेट विश्वातून पाकिस्तानवर जोरदार टीका केली. मात्र पाकिस्तान भविष्यातील संबंध आणि आर्थित तोटा पाहता हा निर्णय मागे घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशात आता याबाबतीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पाकिस्तानने टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी 1 अट ठेवल्याचं समजत आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

पाकिस्तानची बांगलादेशसाठी ‘फिल्डिंग’

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशचा या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत समावेश केला तरच पाकिस्तान भारत विरूद्धच्या सामन्यात खेळेल. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. तसेच बांगलादेशने सुरक्षेचं कारण पुढे करत या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयच्या आदेशानंतर आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स या फ्रँचायजीने आपल्या संघातून बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याची हकालपट्टी केली. त्यानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला अचानक त्यांचे खेळाडू भारतात सुरक्षित नसल्याचं जाणवलं. त्यामुळे बांगलादेशने आयसीसीकडे त्यांचे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने हे श्रीलंकेत खेळवण्यात यावे, अशी विनंती केली. मात्र आयसीसीने ही विनंती फेटाळून लावली. तसेच इथेच भारतात सामने खेळावे लागतील, असंही ठणकावून सांगितलं. त्यानंतर बांगलादेशने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आयसीसीने या स्पर्धेत बांगलादेशच्या जागी स्कॅॉटलँडचा समावेश केला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी घरफोडी, कुटुंबिय झोपलेले असताना चोरट्यांनी साधला डाव
  • Nashik Crime : Whatsapp ग्रुप, फ्लॅट, लैंगिक शोषण आणि…तरूणींच्या धर्मांतरासाठी असे रचायचे षडयंत्र, वाचून तुम्हीही हादराल
  • बॉलिवूडच्या 5 सर्वात खतरनाक सासू, ज्यांचं नाव ऐकलं तरी अंगावर येतो काटा, शेवटची तर प्रचंड खडूस
  • Hydrogen Train: झुकझुक नाही, सुसाट…देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन वाऱ्यासोबत धावली, तुम्ही पाहिली का?
  • Kolhapur Ambabai Temple | करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in