• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

INDA vs NAM : भारताचा वर्ल्ड कपआधी जबरदस्त विजय, नामिबियाचा 130 धावांनी धुव्वा

February 7, 2026 by admin Leave a Comment


आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यांचा थरार अवघ्या काही तासांवर असताना इंडिया ए टीमने धमाका केलाय. आयुष बडोनी याच्या नेतृत्वात इंडिया ए टीमने वर्ल्ड कप स्पर्धेच्या सराव सामन्यात नामिबियावर जबरदस्त आणि एकतर्फी असा विजय मिळवला आहे. इंडिया ए टीमने बंगळुरुत बीसीसीआय सीओई मैदानात नामिबियासमोर 198 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी नामिबियाला 12.1 ओव्हरमध्ये 67 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने यासह नामिबायचा 130 धावांनी धुव्वा उडवला.

नामिबियाचं 73 बॉलमध्ये पॅकअप

भारताने नामिबियाचं 73 बॉलमध्ये पॅकअप केलं. भारतीय गोलंदाजांसमोर नामिबियाच्या फक्त 2 फलंदाजांनाच दुहेरी आकडा गाठता आला. डिलन लीचर याने 22 धावा केल्या. जान फ्रायलिंक याने 12 धावांचं योगदान दिलं. तर इतर फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर लोंटागण घातलं. भारताच्या गोलंदाजांनी नामिबियाच्या तिघांना आले तसेच त्यांना झिरोवर आऊट करत मैदानाबाहेर पाठवलं. तर 6 फलंदाजांचं दुहेरी आकड्याआधीच पॅकअप केलं.

भारतासाठी गुरजनप्रीत सिंह, मयंक यादव, अशोक शर्मा आणि विपराज निगम या चौघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर कॅप्टन आयुष बडोनी आणि रवी बिश्नोई या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

इंडिया ए ची बॅटिंग

त्याआधी भारताने नाणेफेक जिंकली. कॅप्टन आयुष बडोनी याने बॅटिंगचा निर्णय घेतला. भारताच्या सलामी जोडीने निराशा केली. प्रियांश आर्या 5 आणि उर्विल पटेल याने 14 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यानंतर नमन धीर आणि रियान पराग या जोडीने नामिबियाची धुलाई केली. नमनने 29 बॉलमध्ये 39 रन्स केल्या. तर रियानने सर्वाधिक धावा केल्या.

रियानने 39 चेंडूत 6 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 69 धावांचं योगदान दिलं. तसेच आशुतोष शर्मा याने 35 धावा जोडल्या. तर इतरांना तुलनेत कमजोर असलेल्या नामिबियासमोर काही खास करता आलं नाही. नामिबियासाठी तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर दोघांनी 1-1 विकेट मिळवली.

यूएसएवर 38 धावांनी मात

दरम्यान इंडिया ए टीमने पहिल्या प्रॅक्टीस मॅचमध्ये यूएसएचा पराभव केला होता. उभयसंघातील सामन्याचं 2 फेब्रुवारीला नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आलं होतं. भारताने हा सामना हा 38 धावांनी जिंकला होता.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in