• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ZIM Super 8 Live Streaming : झिंबाब्वे विरूद्धच्या निर्णायक सामन्याच्या वेळेत बदल? किती वाजता सुरुवात होणार?

February 25, 2026 by admin Leave a Comment


आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 48 व्या सामन्यात यजमान टीम इंडिया झिंबाब्वे विरुद्ध 2 हात करणार आहे. दोन्ही संघांचा हा सुपर 8 फेरीतील दुसरा आणि निर्णायक सामना आहे. दोन्ही संघांची सुपर 8 फेरीची सुरुवात पराभवाने झालीय. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असा आहे. सेमी फायनलमधील आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना विजय मिळवणं बंधनकारक आहे. त्यामुळे कोणत्या तरी एका संघाचं पराभवासह आव्हान संपुष्टात येणार असल्याचं निश्चित आहे. अशात या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे.

झिंबाब्वे-टीम इंडियासोबत काय झालं?

झिंबाब्वे आणि टीम इंडिया दोन्ही संघांना सुपर 8 फेरीतील पहिल्या सामन्यात मोठ्या फरकाने पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे या पराभवाचा नेट रनरेटवरही परिणाम झाला. वेस्ट इंडिजने सोमवारी 23 फेब्रुवारीला झिंबाब्वेचा 107 धावांनी धुव्वा उडवला. तर दक्षिण आफ्रिकेने रविवारी 22 फेब्रुवारीला टीम इंडियावर 76 धावांनी विजय मिळवला. या पराभवामुळे आता भारत आणि झिंबाब्वे या दोघांवर दबाव आहे. तसेच झिंबाब्वेने साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला पराभूत केलं आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना प्रतिष्ठेचा झाला आहे. त्यामुळे टीम इंडिया हा सामना जिंकून आव्हान कायम ठेवणार की झिंबाब्वे उलटफेर करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे सामना कधी?

टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे सामना गुरुवारी 26 फेब्रुवारीला होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल. तसेच https://www.tv9marathi.com या आमच्या वेबसाईटवर सामन्याचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेता येतील.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा
  • एप्रिल 2026 मधील विवाहाच्या शुभ मुहूर्तांची जाणून घ्या ही संपूर्ण यादी
  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती
  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in