
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत आपला पहिलावहिला विजय मिळवला आहे. टीम इंडियाने झिंबाब्वेवर 72 धावांनी मात करत उपांत्य फेरीतील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. टीम इंडिया आणि झिंबाब्वेला आपल्या सुपर 8 मोहिमेतील पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे टीम इंडिया आणि झिंबाब्वे या दोन्ही संघांसाठी एकमेकांविरुद्धचा सामना हा करो या मरो असा होता. मात्र टीम इंडियाने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये झिंबाब्वेवर एकतर्फी विजय मिळवला. तर भारताच्या विजयामुळे ए ग्रुपमधून दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहचली आहे.
Leave a Reply