• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ZIM : अभिषेक शर्माने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच केली अशी कामगिरी

February 26, 2026 by admin Leave a Comment


अभिषेक शर्मा हा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत बेभरवशी फलंदाज ठरला. त्याच्याकडून या स्पर्धेच्या सुरुवातीला फार अपेक्षा होत्या. मात्र त्याने भारतीया क्रीडाप्रेमींची निराशा केली होती. पण सुपर 8 फेरीच्या दुसऱ्या सामन्यात त्याला सूर गवसला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध अर्धशतक ठोकलं. (Photo: BCCI Twitter)

अभिषेक शर्माने 30 चेंडूत 55 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 183.33चा होता. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचं नववं अर्धशतक होतं. त्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिलं अर्धशतक ठोकत एक कारनामा केला आहे.  (Photo: BCCI Twitter)

अभिषेक शर्माने या डावात संजू सॅमसनसोबत ओपनिंग पार्टनरशिप म्हणून मोठी भागीदारी केली. या दोघांनी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतासाठी 48 धावांची भागीदारी केली. तर इशान किशनसोबत दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी म्हणजेच 72 धावा काढल्या.  (Photo: BCCI Twitter)

अभिषेक शर्माने या सामन्यात जबरदस्त खेळी केली. सुरुवातीला सावध पवित्रा घेतला. पण त्यानंतर आपला आक्रमक अंदाज दाखवून दिला. त्याने चौकार आणि षटकार मारताना कोणतीच कसर सोडली नाही. त्याने या डावात जितके चौकार मारले, तितकेच षटकार मारले.  (Photo: BCCI Twitter)

अभिषेक शर्माने या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात नकोसा विक्रम केला होता. सलग तीन सामन्यात शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध थोडाफार खेळला. पण झिम्बाब्वेविरुद्ध पूर्ण लय मिळाल्याचं दिसलं. (Photo: BCCI Twitter)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : मोहरीच्या तेलाचा आणि तुरटीचा करा हा चमत्कारीक उपाय, तुमच्या आयुष्यात कोणतीच अडचण येणार नाही
  • इस्रायल बॅकफूटवर… नेतान्याहूंची माघार, लेबनॉनबाबत इस्रायलचा मोठा निर्णय
  • Vastu Shastra : सुख समृद्धीसाठी करा हे 7 सोपे उपाय, आयुष्यात पुन्हा कधी आर्थिक संकट येणार नाही
  • Dieting शिवाय कमरेचा घेर कसा कमी करायचा?
  • Vitamin D च्या कमतरतेने मेंदूचे वय वाढते, नव्या संशोधनात केला दावा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in