• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs USA Live Streaming : टीम इंडिया यूएसए विरुद्ध भिडणार, सूर्यासेनेच्या पहिल्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

February 6, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेट चाहत्यांची गेल्या अनेक महिन्यांची प्रतिक्षा अखेर काही तासांनी संपणार आहे. आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या मोसमात गतविजेता आणि यजमान म्हणून उतरणार आहे. टीम इंडिया स्पर्धेतील पहिल्याच दिवशी आपल्या मोहिमेतील पहिला सामना खेळणार आहे. भारत या सामन्यात यूएसए विरुद्ध 2 हात करणार आहे. दोन्ही संघांनी या सामन्याआधी जोरदार सराव केलाय. अशात उभयसंघातील सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध यूएसए सामना कधी?

टीम इंडिया विरुद्ध यूएसए यांच्यातील सामना 7 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध यूएसए सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध यूएसए सामना क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध यूएसए सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध यूएसए सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध यूएसए सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध यूएसए सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध यूएसए सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

टीम इंडिया विरुद्ध यूएसए सामना जिओहॉटस्टार एपद्वारे टीव्ही/मोबाईल/लॅपटॉपवर लाईव्ह पाहायला मिळेल.

कॅप्टन सूर्याचं वर्ल्ड कपमध्ये पदार्पण

टीम इंडिया या स्पर्धेत सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात खेळणार आहे. सूर्या या सामन्यातून कर्णधार म्हणून वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण करणार आहे. तसेच सूर्याचं वानखेडे स्टेडियम हे होम ग्राउंड आहे. त्यामुळे लोकल बॉय सूर्या आपल्या घरच्या मैदानात कशी कामगिरी करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मोनांक पटेल याच्याकडे यूएसएच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे.

सराव सामन्यात इंडिया ए विजयी

दरम्यान इंडिया ए ने सराव सामन्यात यूएसएचा 38 धावांनी पराभव केला होता. यूएसएने 239 धावांचा पाठलाग करताना 200 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे यूएसएला कमी लेखण्याची चूक टीम इंडिया करणार नाही. अशात यूसएसए टीम इंडियाच्या मुख्य संघासमोर कशी कामगिरी करते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराण संघर्षात सौदीने वाढवले गॅसचे दर, भारत आणि चीन यांनी बदलली रणनिती
  • इराणने जिरवली! जखमी अमेरिकन सैनिकांनी सांगितलं असं सत्य की… डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा
  • मद्यपानापूर्वी दारूचे दोन थेंब जमिनीवर का शिंपडतात? अट्टल बेवड्यालाही माहिती नसेल खरं कारण
  • 6 मिनिट 9 सेकंदाचं गाणं, ज्याने लोकांना आणलं होतं अडचणीत, देशभरात अनेकांना झाली होती अटक
  • …म्हणून केकेआरचा पराभव! कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटच्या षटकात काय घडलं ते सांगितलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in