• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs USA : यूएसए विरुद्ध टीम इंडियाला मोठा झटका, जसप्रीत बुमराह पहिल्याच सामन्यातून आऊट, संजूला डच्चू

February 7, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाला आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात मोठा झटका लागला आहे. टीम इंडिया विरुद्ध यूएसए यांच्यातील सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. यूएसएचा कर्णधार मोनांक पटेल याने नाणेफेक जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाला या निमित्ताने पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे विस्फोटक फलंदाज किती भारताला किती धावसंख्येपर्यंत पोहचवण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टीम इंडियाला मोठा झटका

टीम इंडियाचा प्रमुख आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला या सामन्यात तब्येत बरी नसल्याने मुकावं लागलं आहे. त्यामुळे बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याला दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर व्हावं लागलंय. तर ओपनर आणि विकेटकीपर संजू सॅमसन याला अपेक्षेप्रमाणे डच्चू देण्यात आला आहे.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : इशान किशन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि वरुण चक्रवर्ती

यूएसए प्लेइंग ईलेव्हन : अँड्रिज गॉस (विकेटकीपर), साईतेजा मुक्कामल्ला, मोनांक पटेल (कर्णधार), मिलिंद कुमार, संजय कृष्णमूर्ती, शुभम रांजणे, हरमीत सिंग, मोहम्मद मोहसीन, शेडली व्हॅन शाल्क्विक, अली खान आणि सौरभ नेत्रावळकर.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IND vs USA : कॅप्टन सूर्या एकटाच भिडला, घरच्या मैदानात विक्रमी खेळी, यूएसएसमोर 162 धावांचं आव्हान, जिंकणार?
  • Bigg Boss Marathi 6 Divya Shinde: तलवारीने मारण्याची धमकी देणाऱ्या दिव्याची हाकलपट्टी… आता म्हणते, ‘खूप काही सांगायचंय…’
  • दमदार बॅटरी पॉवर आणि 144Hzडिस्प्लेसह हा नवीन अँड्रॉइड टॅबलेट लाँच, जाणून घ्या किंमत
  • Rose Day 2026: लाल की गुलाबी? गर्लफ्रेंडला कोणता गुलाब द्यायचा? प्रत्येक रंगात दडलाय प्रेमाचा वेगळा अर्थ!
  • RSS कोणाच्या विरोधात नाही, आमचे काम संपूर्ण देशासाठी – मोहन भागवत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in