• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs USA : भारताची पहिल्याच विजयासह ऐतिहासिक कामगिरी, ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

February 7, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आपल्या मोहिमेची विजयाने सुरुवात केली. भारताने 7 फेब्रुवारीला यूएसएवर मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये 29 धावांनी मात केली. भारताला या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दरम्यान संघर्ष करावा लागला. यूएसएने चांगली झुंज दिली. मात्र टीम इंडियाने आपण गतविजेता आणि टी 20i रँकिंगमधील नंबर 1 का आहोत हे दाखवून दिलं. भारताने 162 धावांचा पाठलाग करणाऱ्या यूएसएला 132 रन्सवर रोखलं. भारताचा हा यूएसए विरुद्धचा सलग आणि एकूण दुसरा विजय ठरला. तसेच टीम इंडियाने या मोहिमेतील पहिल्याच विजयासह इतिहास घडवला. टीम इंडियाने वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.

भारताकडून वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेला धोबीपछाड

टीम इंडियाने यूएसए संघाला पराभूत करुन ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला झटका दिला. टीम इंडियाने या दोन्ही संघांचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. इंडिया टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक सलग सामने जिंकणारी पहिली टीम ठरली. यूएसए विरूद्धच्या सामन्याआधी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सलग सर्वाधिक 8 सामने जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा संयुक्तरित्या भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. मात्र वानखेडेत विजय मिळवताचा भारताने इतिहास घडवला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘रोज डे’ निमित्ताने आवडत्या व्यक्तीला ‘या’ शायरीमधून द्या शुभेच्छा, आयुष्यभर लक्षात राहिल
  • स्वप्नात सूर्यग्रहण पाहणे शुभ की अशुभ, स्वप्न शास्त्र काय सांगते?
  • T20 World Cup : टीम इंडियाचा पहिल्या सामन्यात पाकिस्तानला धोबीपछाड, आता सामना खेळला नाही तर…
  • महाशिवरात्रीला जलाभिषेक करायचा आहे? हे आहेत शुभ मुहूर्त
  • Sachin Pilgaonkar: वयाच्या 65व्या वर्षीही मला… सचिन पिळगावकर यांचा खळबळजनक दावा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in