• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs USA : गंभीरचा एक मेसेज आणि सूर्याने गेम फिरवला, कॅप्टनने सांगितला टर्निंग पॉइंट

February 7, 2026 by admin Leave a Comment


सूर्यकुमार यादव याने टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत कर्णधार म्हणून पदार्पण केलं. सूर्याने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात भारताला जिंकवलं. भारताने संघर्षपूर्ण अशा सामन्यात यूएसवर मात केली. भारताने यासह या स्पर्धेत विजयी सुरुवात केली. भारताचा हा टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग नववा विजय ठरला. सूर्याचं होम ग्राउंड असलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडिया अडचणीत सापडलेली. मात्र सूर्याने निर्णायक क्षणी चिवट खेळी केली. सूर्याच्या नाबाद 84 धावांच्या या खेळीच्या जोरावर भारताने 161 धावांपर्यंत मजल मारली. यूएसएला 162 धावांचा पाठलाग करताना 132 पर्यंतच पोहचता आलं. भारताने यासह यूएसएला सलग दुसऱ्यांदा पराभूत केलं. कर्णधार सूर्यकुमार यादव याने या विजयानंतर भावना व्यक्त केल्या. सूर्याने हेड कोच गौतम गंभीरबाबत काय प्रतिक्रिया दिली? हे जाणून घेऊयात.

सूर्या गंभीरबाबत काय म्हणाला?

अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात फार दबाव होता. मात्र हेड कोच गौतम गंभीरने दबावात असताना शांतपणे खेळण्याचा सल्ला दिला. त्यामुळे फार मदत झाल्याचं सूर्याने सामन्यानंतर प्रेझेंटेटरसोबत बोलताना सांगितलं. बॅटिंग करताना झालेल्या ड्रिंक ब्रेक दरम्यान गंभीरने काय सांगितलं याची माहिती सूर्याने दिली. “फक्त शेवटपर्यंत बॅटिंग करत रहा. नंतर वेगात धावा करशील”, असं गंभीरने बॅटिंगदरम्यान ड्रिंक ब्रेकमध्ये सांगितल्याचं सूर्या म्हणाला.

“ही खेळपट्टी 180-190 धावांची नाही असं वाटत होतं. या खेळपट्टीवर 140 च्या आसपास धावा होतील. गौती भाईनेही (गौतम गंभीर) 14 व्या ओव्हरनंतर ड्रिंक ब्रेक दरम्यान मला असंच सांगितलं. गौती भाईने मला शेवटपर्यंत बॅटिंग करण्याच्या प्रयत्न कर, शेवटी तु फटकेबाजी करुन धावा वसुल करु शकतोस, असा विश्वास दिला”, असं सूर्याने म्हटलं.

सूर्याचा आत्मविश्वास

“6 आऊट 77 रन्स अशी स्थिती असताना माझ्यावर किती दबाव होता हे मीच सांगू शकतो. मात्र मी अशाच स्थितीत याआधी बॅटिंग केलीय, हा आत्मविश्वास होता. मी मुंबईतील आझाद मैदान, क्रॉस मैदान आणि इतर मैदानात खूप खेळलोय. त्यामुळे शेवटपर्यंत बॅटिंग केली तर मी फरक पाडू शकेन हा विश्वास होता”, असं सूर्याने म्हटलं.

सूर्याची झुंजार खेळी

टीम इंडियाची 12.4 ओव्हरमध्ये 6 आऊट 77 अशी नाजूक स्थिती झाली होती. मात्र इथून लोकल बॉय सूर्याने कमाल केली. सूर्याने यूएसए विरुद्ध किल्ला लढवला. सूर्याने 49 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या. सूर्याने या खेळीत 10 चौकार आणि 4 षटकार लगावले. सूर्याच्या या खेळीमुळेच भारताला 9 विकेट्स गमावून 161 धावा करता आल्या. मात्र यूएसए टीमला 132 धावाच करता आल्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कारच्या डॅशबोर्डवर ‘या’ मूर्त्या ठेवणे पडू शकते महागात, जाणून घ्या हे वास्तू नियम
  • जरांगे पाटील यांची मानसिकता तपासली पाहिजेत, लक्ष्मण हाके यांचा जोरदार हल्ला
  • WI vs SCO T20 WC Result: वेस्ट इंडिजने स्कॉटलँडला 35 धावांनी नमवलं, हेटमायर-शेफर्ड चमकले
  • शरद पवारांची रोहित आणि पार्थ पवारांसोबत चर्चा, वेगवेगळ्या चर्चांना उधाण; त्या फोटोचा नेमका अर्थ काय?
  • Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरातून घरी आणा या गोष्टी, कधीच भासणार नाही पैशांची कमतरता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in