
वूमन्स टीम इंडियाने तिरुवनंतरपुरममधील पाचव्या आणि अंतिम टी 20I सामन्यात श्रीलंकेसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर भारताची अडखळत सुरुवात झाली. श्रीलंकेने भारताला सुरुवातीपासून ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे टॉप ऑर्डरमधील फलंदाजांना काही खास करता आलं नाही. मात्र त्यानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौर, अमनजोत कौर आणि अरुंधती रेड्डी या तिघींनी निर्णायक खेळी केली. त्यामुळे भारताला 175 धावांपर्यंत पोहचता आलं. आता टीम इंडिया या धावांचा यशस्वी बचाव करत सलग पाचवा सामना जिंकून श्रीलंकेचा व्हाईटवॉश करणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
टीम इंडियाने या मालिकेतील सलग आणि एकूण 4 सामने जिंकलेत. त्यामुळे भारताकडे पाचवा सामना जिंकून श्रीलंकेचा 5-0 ने धुव्वा उडवण्याची संधी आहे. त्यामुळे श्रीलंकेसमोर अंतिम सामना जिंकून लाज राखण्याचं आव्हान आहे.
Leave a Reply