• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs SA, Super 8 : टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये 4 बदल, कुणाचा समावेश?

February 22, 2026 by admin Leave a Comment


टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत साखळी फेरीत सर्वच्या सर्व 4 सामने जिंकून सुपर 8 मध्ये रुबाबदार एन्ट्री केली. त्यानंतर आता टीम इंडिया सुपर 8 फेरीसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया सुपर 8 फेरीत एकूण 3 सामने खेळणार आहे. टीम इंडियासमोर या फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान आहे. सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार एडन मार्करम याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल नाही

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. टीम इंडिया या सामन्यात नेदरलँड्स विरुद्धच्या प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेने 4 बदल केले आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून कुणाला संधी मिळालीय हे जाणून घेऊयात.

टीम इंडिया चेस करणार

टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत साखळी फेरीतील चारही सामने धावांनी जिंकले आहेत. त्यामुळे आता टीम इंडिया चेसिंग करताना विजयी घोडदौड कायम राखण्यात यशस्वी ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अहमदाबादमध्ये दोन्ही संघ अजिंक्य

टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांनी या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत साखळी फेरीत अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळलेले सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेने साखळी फेरीतील 4 पैकी पहिले 3 सामने जिंकले आहेत. तर भारताने साखळी फेरीतील चौथा आणि नेदरलँड्स विरुद्धचा शेवटचा एकमेव सामना हा जिंकला आहे.

टीम इंडियाची अहमदाबादमधील कामगिरी

टीम इंडियाने अहमदाबादमध्ये एकूण 9 टी 20I सामने खेळले आहेत. भारताने या 9 पैकी 7 टी 20I सामन्यांत विजय मिळवला आहे. तर भारताला 2 वेळा या मैदानात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

टीम इंडियाचे सलग 12 विजय

दरम्यान टीम इंडिया आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत सलग 12 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2024 मधील टी 20I वर्ल्ड कप जिंकला होता. भारताने त्या स्पर्धेत सलग आणि एकूण 8 सामने जिंकले होते. तर त्यानंतर आता सूर्याच्या नेतृत्वात भारताने या वर्ल्ड कप स्पर्धेत साखळी फेरीतील सलग 4 सामन्यांत विजय मिळवला आहे. अशात आता टीम इंडिया सलग 13 वा सामना जिंकून सुपर 8 मध्ये विजयी सलामी देणार का? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nashik Crime : Whatsapp ग्रुप, फ्लॅट, लैंगिक शोषण आणि…तरूणींच्या धर्मांतरासाठी असे रचायचे षडयंत्र, वाचून तुम्हीही हादराल
  • बॉलिवूडच्या 5 सर्वात खतरनाक सासू, ज्यांचं नाव ऐकलं तरी अंगावर येतो काटा, शेवटची तर प्रचंड खडूस
  • Hydrogen Train: झुकझुक नाही, सुसाट…देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन वाऱ्यासोबत धावली, तुम्ही पाहिली का?
  • Kolhapur Ambabai Temple | करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
  • मुलांसोबत ती घर सोडून गेली अन् मी..; रीना दत्तासोबतच्या घटस्फोटाबाबत आमिर खानचा खुलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in